-
हिवाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे त्वचेचे तीन प्रकार आहेत.
-
रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा धुताना फेसवॉशचा वापर करा. चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते.
-
हिवाळ्यात आंघोळीसाठी जास्त गरम पाणी वापरू नका आणि जास्त वेळ पाण्यात राहू नका.
-
हिवाळ्यामध्ये आंघोळ करत असताना शरीराला खूप जास्त घासू नका. आंघोळ झाल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायस ठेवण्यासाठी ओलसर त्वचेवरच मॉइश्चरायझर किंवा तेल लावावे.
-
हिवाळ्यात सामान्य मॉइश्चरायजर वापरण्याऐवजी ऑइल बेस्ट मॉइश्चरायजरचा वापर करावा. त्वचेला अधिक चांगले बनवण्यासाठी तुम्ही खास रात्री लावण्यासाठी बनवलेले डीप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता.
-
हिवाळ्यात तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा मॉइश्चरायझर बरोबरच तुमच्या त्वचेला सनस्क्रीन लावायला विसरू नका. सनस्क्रीन तुमच्या त्वचेची अतिरिक्त सूर्य किरणांपासून सुरक्षा करून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
-
त्वचा हायड्रेट करण्यासाठी इसेन्शिअल ऑईल नेहमीच मदत करतात. लव्हेंडर ऑईल, खोबरेल तेल, प्राईमरोज ऑईल सारख्या इसेन्शिअल ऑईलचा वापर करा.
-
थंडीच्या दिवसांत ओठ मऊ ठेवण्यासाठी कोरफड, साखर आणि नारळाच तेल, हळद, दूध, आणि बदाम तेल आणि लिंबू यांपासून बनलेले स्क्रब ओठांसाठी उपयोगी ठरतात. यांमधील घटक ओठांमधील कोरडेपणा कमी करतात. -
ज्यांना चेहऱ्यावर पुरळ आहेत, अशा व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फेशिअल ऑईलचा वापर करणे फायदेशीर ठरेल.
-
मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबरचा वापर करा. आठवडयातून दोनदा चेहरा स्क्रब केला तरी चालेल, फक्त त्वचा जास्त कोरडी होणार नाही आणि तिचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. -
तुम्ही गुलाबपाणी आणि ग्लिसरीन असलेली उत्पादने वापरू शकता. त्यामुळं, हिवाळ्यात अशा गोष्टी निवडा ज्यामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेट होईल.
-
त्वचेला अधिक चांगले बनवण्यासाठी तुम्ही खास रात्री लावण्यासाठी बनवलेले डीप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. (फोटो सौजन्य : pixabay)
Photos : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा; त्वचा राहील कोमल आणि मुलायम
हिवाळ्यात त्वचा कोरडी तसेच रफ होते. थंड हवेमुळे हिवाळ्यात त्वचेशी निगडीत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. हिवाळा आला की त्वचा काळी पडू लागते. थंडीमध्ये त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होतं आणि त्वचा कोरडी होते. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा. यामुळे हिवाळ्यात तुमची त्वचा कोमल आणि मुलायम राहील.
Web Title: Follow these tips to take care of your skin in winter pdb