-
संत्री हे असे फळ आहे ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
-
चवीला आंबट-गोड असलेली संत्री आरोग्याला लाभदायी ठरते.
-
रोज संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्दीपासून संरक्षण आणि त्वचेच्या आरोग्यासाठी संत्री रामबाण ठरते.
-
हिवाळ्यात रोज एक संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनशक्ती मजबूत करते.
-
संत्र्यामध्ये विरघळणारे फायबर जास्त प्रमाणात असल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही. भूक कमी लागल्याने वजन नियंत्रणात राहते.
-
संत्र्याच्या सेवनाने शरीरातील कॅलरीज देखील कमी होतात.
-
संत्री केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपली त्वचाही चांगली ठेवते.
-
संत्री मुरुम, डाग दूर करते आणि त्वचा चमकदार बनवते.
-
संत्रीच्या सेवनाने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसत नाही. सुरकुत्या, बारीक रेषा आदी समस्या कमी होत ग्लोईंग त्वचा मिळते.
-
संत्री हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
-
डोळ्यांसंदर्भात काही तक्रारी असतील तर रोज संत्री खाण्याची किंवा संत्र्याचा रस पिण्याची सवय लावा.
-
संत्र्याचे सेवन केल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते. (फोटो साैजन्य-pixabay.com)
Photos: Winter Health Tips: हिवाळ्यात दररोज बहुगुणी संत्री खाण्याचे मिळतील आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या एका क्लिकवर
Benefits Of Orange: केशरी रंगाच्या संत्री दिसायला मनमोहक आणि चवीला आंबट-गोड असल्यामुळे सगळ्यांच्याच आवडीचे असे हे फळ आहे. तसेच आरोग्यासाठीही तितकेच लाभदायक आहे. हिवाळ्यात आरोग्यविषयक काही समस्या निर्माण होतात. यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. अशात खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे रोग…
Web Title: There are many benefits of eating oranges in winter pdb