-
किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. किडनी प्रामुख्याने युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्ताला फिल्टर करण्यासाठी मदत करते. (Photo-Indian Express)
-
भारतात किडनीचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. (Photo: संग्रहित)
-
किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सौम्य असतात की हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही. (Photo: Freepik)
-
आम्ही तुम्हाला किडनी फेल होण्याची काही लक्षणं सांगणार आहोत, जी तुम्हाला वेळेवर सांगतील की तुमची किडनी खराब होऊ लागली आहे आणि तुम्ही त्याकडे लवकर लक्ष दिले पाहिजे.(Photo: jansatta)
-
थकवा – मोठ्या प्रमाणात थकवा जाणवणं हीदेखील किडनी नीट काम करत नसल्याची लक्षणं आहेत. (Photo: Freepik)
-
पुरेशी झोप न मिळणे – नीट झोप न येणे हे किडनीच्या आजाराशी निगडीत आहे. किडनी खराब होण्याच्या या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नका. (Photo: Pexels)
-
कोरडी त्वचा आणि खाज – कोरडी त्वचा आणि सारखी खाज येणे हे रक्तातील खनिजांचे प्रमाण कमी झाल्याचे, तसेच हाडांच्या आजाराचे लक्षण आहे. त्यामुळे अशी लक्षणे दिसून आल्यास किडनीची चाचणी करून घ्यावी. (Photo: jansatta)
-
वारंवार सूज येणं – किडनी नीट काम करत नसल्यास शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. त्यामुळे पायांमध्ये आणि घोट्याला सूज येऊ लागते. ही लक्षणे दीर्घकाळ दिसत असल्यास किडनीची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. यासोबतच, मसल क्रॅम्प्स होणे हेदेखील किडनीच्या आजाराचे लक्षण आहे. (Photo: प्रातिनिधिक)
-
डोळ्याभोवती सूज येणे – तुमच्या डोळ्याभोवती सूज आल्यास, तुमच्या मूत्रपिंडाची तपासणी करा. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे लघवीतून प्रथिने बाहेर पडल्यास डोळे फुगतात. (Photo: संग्रहित छायाचित्र)
-
स्नायू दुखणे – जेव्हा मूत्रपिंड पूर्णपणे प्रक्रिया करू शकत नाहीत तेव्हा शरीरात टाकाऊ विषारी पदार्थांचे प्रमाण आणि खनिजांच्या अनावश्यक पातळीमुळे देखील असह्य स्नायू वेदना होऊ शकतात. स्नायू दुखणे हलके घेऊ नये. (Photo: jansatta)
-
नीट श्वास घेता न येणे – जेव्हा मूत्रपिंडात समस्या असते तेव्हा रुग्णाला नीट श्वास घेता येत नाही जे एरिथ्रोपोएटिन नावाच्या हार्मोनच्या कमतरतेमुळे असू शकते. हार्मोन्स तुमच्या शरीराला लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी सिग्नल देतात. त्याशिवाय तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. (Photo: jansatta)
-
सतत लघवी येणं – एक सामान्य निरोगी व्यक्ती दिवसातून ६-१० वेळा लघवी करते. वारंवार लघवी होणे हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण आहे. मूत्रपिंडाच्या समस्येच्या बाबतीत, व्यक्तीला खूप वेळा लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते. ही स्थिती किडनीला नुकसान पोहोचवते. (Photo: Pixabay)
Photos: Kidney Damage Symptoms: किडनी खराब होण्याआधी शरीरात दिसतात ‘हे’ लक्षणे; वेळीच व्हा सावध!
Kidney Damage Symptoms: आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांमध्ये मूत्रपिंड, म्हणजेच किडनीचा समावेश होतो. किडनीच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचे असते. मूत्रपिंडाच्या विकाराची लक्षणं लवकर दिसून येत नाहीत, त्यामुळे बऱ्याच वेळा यावर उपचार करण्यास विलंब होतो. यासाठी शरीरातील काही छोट्याछोट्या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे बदल म्हणजेच भविष्यात तुम्हाला मूत्रपिंडाचा विकार होण्याची लक्षणं असतात. कोणती आहेत ही…
Web Title: Symptoms appear in the body before kidney damage pdb