• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. common mistakes made in winter season can be costly for health make the change today pvp

Photos : हिवाळ्यात केलेल्या ‘या’ सामान्य चुका पडू शकतात महागात; आजच करा बदल

हिवाळ्यात केलेल्या काही सामान्य चुकांमुळे आपण आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान करू शकतो. या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

Updated: December 19, 2022 18:15 IST
Follow Us
  • Common Mistakes in Winter
    1/18

    राज्यासह देशभरात हिवाळा सुरु झाला असून आता वातावरणात गारवाही जाणवू लागला आहे.

  • 2/18

    मात्र, हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार होण्याची शक्यता अधिक असते.

  • 3/18

    हिवाळ्यात ताप आणि संसर्ग यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अतिशय आवश्यक असते.

  • 4/18

    मात्र हिवाळ्यात केलेल्या काही सामान्य चुकांमुळे आपण आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान करू शकतो. या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • 5/18

    हिवाळ्यात कडक गरम पाण्याने अंघोळ करणे अनेकांना आवडते. मात्र, जास्तवेळ गरम पाण्यात राहिल्याने शरीर आणि मेंदूवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

  • 6/18

    असे म्हटले जाते की अंघोळीसाठी कडक गरम पाण्याचा वापर केल्याने केराटिन नामक त्वचेच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. यामुळे खाज येणे, कोरडेपणा, आणि पुरळ उठण्याची समस्या जाणवू शकते.

  • 7/18

    हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी बरेच लोक जास्त कपडे घालतात. परंतु जास्त कपडे परिधान केल्यामुळे, शरीर अतिउष्णतेचे बळी ठरू शकते. शरीराच्या अतिउष्णतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.

  • 8/18

    आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात सेरोटोनिनची पातळी कमी होते. परिणामी, आपल्या शरीराला अधिक कर्बोदक हवे असते.

  • 9/18

    म्हणूनच हिवाळ्यात भूक वाढू लागते. त्यामुळे हिवाळ्यात जास्त अन्न खाणे टाळा. जास्त भूक लागल्यास फक्त फायबर असलेल्या भाज्या किंवा फळे खा.

  • 10/18

    हिवाळ्यात अनेक लोक चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन करू लागतात. परंतु चहा-कॉफीचे अतिसेवन शरीराला हानी पोहोचवते. कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

  • 11/18

    हिवाळ्यात गरमागरम सूप पिणे अनेकांना आवडते. मात्र सूप बनवताना योग्य पदार्थांची निवड करणे अतिशय आवश्यक आहे.

  • 12/18

    तज्ज्ञांनुसार, हिवाळ्यात सूपच्या रेसिपीमध्ये अधिक मोसमी उत्पादनांचा समावेश करणे नेहमीच चांगले असते जेणेकरून ते शरीराला योग्य पोषण प्रदान करेल.

  • 13/18

    हिवाळ्यात आपल्याला कमी तहान लागते आणि म्हणूनच बरेच लोक पाण्याचे सेवन कमी करतात.

  • 14/18

    मात्र, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात केले पाहिजे. पाण्याचे सेवन कमी केल्याने अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

  • 15/18

    हिवाळ्यात थंडीमुळे अनेकजण घराबाहेर पडणे टाळतात. घरात राहिल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. घरी राहिल्याने तुमची शारीरिक हालचाल कमी होऊ शकते.

  • 16/18

    निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच या ऋतूमध्ये आळस न करता व्यायाम आणि योगासने करा.

  • 17/18

    या ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळे चटपटीत पदार्थ आणि फास्ट फूड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर करतो. मात्र, यामुळे लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

  • 18/18

    सर्व प्रातिनिधिक फोटो : Pexels

TOPICS
हिवाळाWinterहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Common mistakes made in winter season can be costly for health make the change today pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.