-
किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. किडनी निकामी झाल्यास आपलं जगणं अवघड होऊ शकतं. (Freepik)
-
रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करून रक्त स्वच्छ करणे आणि लघवीद्वारे टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे हे किडनीचे मुख्य कार्य आहे. किडनी एक प्रकारे फिल्टरचे काम करते, ज्यामुळे आपलं रक्त शुद्ध आणि संतुलित राहते. (Freepik)
-
किडनी रक्त फिल्टर करते आणि सोडियम, कॅल्शियम आणि इतर घटक लघवीद्वारे शरीरातून काढून टाकते. (Freepik)
-
जेव्हा रक्तातील या घटकांचे प्रमाण वाढते तेव्हा ते किडनीमध्ये जमा होतात आणि त्याचा गोळा बनतो. त्याला किडनी स्टोन म्हणतात. (Freepik)
-
किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने दिवसातून किमान ८-९ ग्लास पाणी प्यावे. तुम्हालाही किडनी स्टोनचा त्रास असेल तर आहारात काही पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ तुमची समस्या वाढवू शकतात. (Freepik)
-
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळा. कोल्ड्रिंक्समध्ये असलेले फॉस्फोरिक अॅसिड स्टोन तयार होण्याचा धोका वाढवते. (Freepik)
-
ज्या लोकांना स्टोनची समस्या आहे, त्यांनी कॉफी आणि चहा टाळावा. कॉफी किंवा चहामध्ये असलेले कॅफिन शरीरातील डिहायड्रेशनची समस्या वाढवू शकते, ज्यामुळे किडनी स्टोनच्या रुग्णांना जास्त वेदना होऊ शकतात. (Freepik)
-
किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारातील प्रथिनांचे प्रमाण कमी करावे. प्रथिनांच्या सेवनामुळे किडनीवर परिणाम होतो. (Freepik)
-
अधिक प्रथिने खाल्ल्याने, शरीरातून लघवीद्वारे अधिक कॅल्शियम काढून टाकले जाते. (Freepik)
-
प्रथिनांच्या सेवनाने शरीरात प्युरीन एन्झाईम्सचे प्रमाण वाढते, त्यामुळे यूरिक अॅसिड वाढू लागते आणि किडनीमध्ये स्टोनचा आकार वाढू लागतो. (Freepik)
-
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर मिठाचे सेवन मर्यादित करा. जंक फूड, कॅनमधील खाद्यपदार्थ आणि स्नॅक्समध्ये जास्त मीठ वापरले जाते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा. (Pexels)
-
टोमॅटो, वांगी, कच्चा तांदूळ, राजगिरा, आवळा, सोयाबीन, चिकू, भोपळा, सुकी फरसबी, उडीद डाळ, हरभरा आणि राजमा हे या भाज्या आणि कडधान्य किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांनी खाणं टाळावं. (Pexels)
किडनी स्टोन आहे? ‘मग या’ पदार्थांपासून राखा अंतर; मूतखड्याचा त्रास वाढण्यासाठी ठरतात कारणीभूत!
तुम्हालाही किडनी स्टोनचा त्रास असेल तर आहारात काही पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ तुमची समस्या वाढवू शकतात.
Web Title: Healthy diet stay away from these foods if you have kidney stone can increase the problem pvp