• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. from diabetes to infertility many diseases will be removed know the miraculous benefits of eating fenugreek in winter pvp

Photos: मधुमेह ते व्यंध्यत्व, अनेक आजार होतील दूर; जाणून घ्या हिवाळ्यात मेथी खाण्याचे चमत्कारी फायदे

हिवाळ्यात मेथी खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात ते जाऊन घेऊया.

December 1, 2022 11:05 IST
Follow Us
  • benefits of eating fenugreek methi in winter
    1/12

    हिवाळ्यात बाजारामध्ये हिरव्या पालेभाज्यांची रेलचेल पाहायला मिळते. अनेक आरोग्य तज्ज्ञांनुसार या ऋतूमध्ये पालक, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. (Freepik)

  • 2/12

    हिरवी मेथी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेकांना मेथीचा पराठा, डाळ आणि मेथीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खूप आवडतात. प्रत्येक घरात, लोक वेगवेगळ्या पद्धतीने ते तयार करतात आणि खातात. (Freepik)

  • 3/12

    मेथीची भाजी खूप चविष्ट असते. त्यामुळे या हिवाळ्यात तुम्हीही मेथी खाऊ शकता. हिवाळ्यात मेथी खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात ते जाऊन घेऊया. (Pixabay)

  • 4/12

    मेथीमध्ये फायबर आढळते, त्यामुळे मेथी खाल्ल्यानंतर भूक कमी लागते आणि पोट भरलेले राहते. मेथीचे दाणे वजन कमी करण्यातही गुणकारी आहेत. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात मेथीचा समावेश करू शकता. (Freepik)

  • 5/12

    रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असलेल्यांसाठी मेथी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात मेथी जरूर खावी. मेथीची भाजी मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते. म्हणूनच रोजच्या जेवणात मेथीची भाजी खावी. तुम्ही मेथी डाळीत टाकूनही खाऊ शकता. (Freepik)

  • 6/12

    पचनाच्या कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. त्यामुळेच लोक बहुतेक पदार्थांमध्ये मेथीची फोडणी देतात. त्यामुळे जेवणाची चवही वाढते. (Pixabay)

  • 7/12

    मेथीचा वापर विशेषतः गॅस्ट्रिक भाज्यांमध्ये केला जातो. मेथीची भाजी खाल्ल्याने पोटात गॅस आणि जडपणा यासारख्या समस्यापासून लगेच आराम मिळतो. (Freepik)

  • 8/12

    हिवाळ्यात बहुतेक लोकांना पोटदुखीची समस्या असते, त्यांनी मेथीच्या भाजीचे सेवन अवश्य करावे. त्याच वेळी, हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढण्यास प्रतिबंध करते. (Freepik)

  • 9/12

    हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत हृदयविकार असलेले लोक निरोगी राहण्यासाठी मेथीच्या भाजीचे सेवन करू शकतात. (Freepik)

  • 10/12

    मेथीची पाने त्वचेच्या काळजीसाठी देखील चांगली आहेत. या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे त्वचेला हानी पोहोचवणारे मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास प्रभावी असतात. याशिवाय मेथीच्या दाण्यांचा फेस मास्कही चेहऱ्यासाठी चांगला असतो. (Freepik)

  • 11/12

    खराब कोलेस्टेरॉल आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवते. मेथी कोलेस्ट्रॉल कमी करू शकते. रोजच्या व्यायामासोबतच दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मेथीची खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. (Pixabay)

  • 12/12

    मेथी टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणूंची पातळी वाढवण्यास मदत करते. २०१७ च्या अभ्यासानुसार, ५० पुरुषांना तीन महिन्यांसाठी मेथीचा अर्क देण्यात आला. निष्कर्षांनुसार सुमारे ८५ टक्के पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या वाढली आहे. मेथी मानसिक सतर्कता, मूड आणि कामवासना सुधारू शकते. (Freepik)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: From diabetes to infertility many diseases will be removed know the miraculous benefits of eating fenugreek in winter pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.