• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. be careful iron deficiency can cause skin problems and hair loss pdb

Photos: तुमच्या शरीरात लोहाची कमतरता आहे हे कसं ओळखाल? ‘अशी’ लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावधान!

Iron Deficiency Symptoms: लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते. शरीरात लोहाची कमतरता असल्यास अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात.

Updated: December 2, 2022 17:03 IST
Follow Us
  • Which are the iron rich food what symtoms are seen where there is lack of hemoglobin
    1/9

    तुमच्या शरीरात लोहाची (Iron) कमतरता असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरात लोह हे अत्यंत आवश्यक पोषक तत्व असून ते शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते.

  • 2/9

    शरीरातल्या लाल रक्तपेशी कमी प्रमाणात असल्यास त्याला लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला अॅनिमिया म्हणतात. भारतात पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये एनीमियाची समस्या जास्त आढळते. परंतु अॅनिमिया व्यतिरिक्त, लोहाच्या कमतरतेमुळे केस आणि त्वचेची समस्या देखील वाढू शकते.

  • 3/9

    अॅनिमियामध्ये वाढ झाल्याने डोळ्या खालील काळी वर्तुळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी केल्याने डोळ्यांखालील भाग गडद दिसू लागतो.

  • 4/9

    लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमियाचा धोका वाढतो. तसेच लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता असते. यामुळे केस गळती होते.

  • 5/9

     सुरुवातीला लोहाच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीस पुरेसे ऑक्सिजन आवश्यक आहे, जे रक्तामधून मिळते. जेव्हा पुरेसा ऑक्सिजन नसतो तेव्हा आपण थकल्यासारखे, कमकुवत आणि श्वास घेताना थकवा जाणवतो.

  • 6/9

    लोहाच्या कमतरतेमुळे त्वचा आणि नखे पांढरे होऊ लागतात. लोहाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशी कमी बनतात. 

  • 7/9

    लोहाच्या कमतरतेमुळे त्वचेला खाज येणं आणि रंग कमी होऊ शकतो. जेव्हा निरोगी शरीर ठेवण्याचा प्रश्न येतो. तेव्हा आपली पोषक तत्व आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावतात. आपला आहार संतुलित असावा आणि पौष्टिक असावा. 

  • 8/9

    लोहाच्या कमतरतेमुळे डोकेदुखी चक्कर येणे होऊ शकते.

  • 9/9

    लोहाच्या कमतरतेमुळे श्वासोच्छवासाचा त्रास आणि अस्वस्थता येते. शरीरात रक्त कमी होते, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता देखील असते. यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो तसेच शरीराला जडपणा येतो.
    (फोटो सौजन्य: संग्रहित छायाचित्र)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Be careful iron deficiency can cause skin problems and hair loss pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.