• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy food health tips consume ayurvedic herbs with ghee many chronic diseases can also be cured pvp

Photos: तुपाबरोबर करा ‘या’ आयुर्वेदिक वनस्पतींचे सेवन; अनेक जुनाट आजारही होऊ शकतात दूर

अशाही काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत, ज्यांच्याबरोबर तुपाचे सेवन केल्यास आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदा होऊ शकतो.

December 2, 2022 17:05 IST
Follow Us
  • Consume Ayurvedic herbs with ghee
    1/12

    आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुपाला खूप महत्त्व आहे. तुपामुळे अन्नाची चव तर वाढतेच, मात्र त्याचबरोबर आपल्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात. असे क्वचितच लोक असतील ज्यांना तूप आवडत नसेल. (Indian Express File Photo)

  • 2/12

    तुपाचा वापर बहुतांश सर्वच अन्नपदार्थांमध्ये करता येतो. मात्र सात्विक पदार्थ आणि नैवेद्य तयार करताना आवर्जून याचा वापर केला जातो. (Freepik)

  • 3/12

    तूप खाल्ल्याने स्थूलता येते असा अनेकांचा समाज असला तरीही यामध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट तुपाच्या सेवनाने आपल्या शरीराला अनेक फायदेच होतात. (freepik)

  • 4/12

    आयुर्वेदातही तुपाचे सेवन करण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अशाही काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत, ज्यांच्याबरोबर तुपाचे सेवन केल्यास आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदा होऊ शकतो. (Unsplash)

  • 5/12

    आयुर्वेदिक तज्ज्ञांनुसार तुपामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. हे गुणधर्म आपल्या शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. (Pexels)

  • 6/12

    मात्र काही आयुर्वेदिक वनस्पतींसह तुपाचे सेवन केल्याने या गुणधर्मांची शक्ती आणखीनच वाढू शकते. हे पदार्थ म्हणजे हळद, तुळस, लसूण, दालचिनी इत्यादी. (Freepik)

  • 7/12

    तुपामध्ये हळद मिसळून खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या दूर होऊ शकते. तसेच यामुळे हृदयाचे आरोग्यही सुधारू शकते. इतकेच नाही तर शरीरातील सूज यामुळे कमी होऊ शकते असेही म्हटले जाते. (Freepik)

  • 8/12

    तुळस ही वनस्पती अनेकप्रकारे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम यासारखे घटक असतात. (Freepik)

  • 9/12

    तूप कढवताना त्यात तुळशीची काही पाने टाकावीत. अशा तुपाचे सेवन केल्याने आपले रक्त शुद्ध होऊ शकते. त्याचबरोबर मानसिक तणावही कमी होण्याची शक्यता आहे. (Freepik)

  • 10/12

    तुपामध्ये कपूर टाकून ते मिश्रण पाच मिनिटे गरम केल्याने तुपामध्ये कपूरचे गुणधर्म उतरतात. अशा तुपाचे सेवन केल्याने वात, पित्त, कफ यासारख्या समस्या दूर होतात. त्याचबरोबर यामुळे आपली पचनशक्तीही सुधारते. तूप आणि कपूरच्या मिश्रणाचे सेवन केल्याने ताप कमी होऊ शकतो तसेच हे हृदयाची गती नियंत्रित करण्यासही मदत करते. दम्याच्या रुग्णांना यामुळे फायदा होऊ शकतो. (Freepik)

  • 11/12

    तुपामध्ये थोडे लसूण आणि लवंग गरम करून खाल्ल्यास उच्च रक्तदाबाची समस्या कमी होऊ शकते असे म्हणतात. (Freepik)

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Freepik)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Healthy food health tips consume ayurvedic herbs with ghee many chronic diseases can also be cured pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.