-
हिवाळ्यात सर्वांनाच कोरडेपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. या ऋतूमध्ये त्वचा फाटणे आणि कोरडी पडणे ही सामान्य समस्या आहे.
-
हिवाळ्यात कोंडा आणि केस गळण्याची समस्याही खूप वाढते. कोंडा झाल्यामुळे केस कमकुवत होतात आणि कपड्यांवर कोंडा पडल्याने आपली प्रतिमाही खराब होऊ शकते.
-
अनेक शॅम्पू आणि कंडिशनर वापरल्यानंतरही, जर तुम्हाला कोंड्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला एक खास आयुर्वेदिक औषध माहित असणे आवश्यक आहे.
-
या औषधाच्या वापराने कोंडा आणि केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल आणि केस चमकदार होतील.
-
हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. कोरडेपणामुळे डोक्यात कोंडा होतो आणि केसगळती वाढते. गरम पाण्याने आंघोळ केल्याने आणि वेगवेगळ्या तेलांचा वापर केल्यानेही कोंड्याची समस्या वाढू शकते.
-
बहुतेक लोक कोंडा टाळण्यासाठी तेल वापरतात, परंतु हे योग्य नाही. कोंडा आणि केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपायांचा वापर केला जाऊ शकतो.
-
जर तुम्हाला हिवाळ्यात वाढणारी कोंड्याची समस्या मुळापासून दूर करायची असेल तर तुम्ही एक खास आयुर्वेदिक रेसिपी वापरू शकता.
-
दाबून तेल काढल्यानंतर जो घन पदार्थ शिल्लक राहतो यामध्ये थोडे ताक मिसळून हे मिश्रण भिजत ठेवावे. मुळ्याच्या पानांचा रस बारीक करून त्यात मेथीचे दाणे टाका. थोडासा भृंगराजही दळून टाकता येईल.
-
हे मिश्रण रात्री तयार करून सकाळी पुन्हा एकत्र करून डोक्याला लावून धुवा. आठवड्यातून किमान दोन वेळा ही कृती करा. यामुळे तुम्हाला तेल लावण्याचीही गरज भासणार नाही आणि एक-दोन महिन्यांत तुमची कोंडा आणि केस गळण्याच्या समस्येपासून पूर्णपणे सुटका होईल.
-
तज्ज्ञांच्या मते केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही तेलाचाही वापर केला जाऊ शकतो. नीली भृंगडी तेलाने तुम्ही तुमचे केस मजबूत करू शकता.
-
क्षीरबाला तैलमचा वापर करूनही तुम्ही केसांच्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता. हिवाळ्याच्या मोसमात केसांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण या ऋतूत त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या उद्भवणं सामान्य गोष्ट आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (प्रातिनिधीक फोटो: Freepik)
Photos: कोंडा आणि केसगळतीची समस्या होणार दूर! ‘हे’ आयुर्वेदिक औषध ठरणार रामबाण उपाय
जर तुम्हाला हिवाळ्यात वाढणारी कोंड्याची समस्या मुळापासून दूर करायची असेल तर तुम्ही एक खास आयुर्वेदिक रेसिपी वापरू शकता.
Web Title: Tips dandruff and hair loss problem will be removed ayurvedic medicine will be a panacea pvp