Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how beneficial is afternoon nap for health know its advantages and disadvantages pros cons pvp

Photos: दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

जर तुम्ही दुपारच्या झोपेच्या आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करणार असाल तर तुम्हाला याचे फायदे तोटे माहीत असणे आवश्यक आहे.

Updated: December 7, 2022 13:13 IST
Follow Us
  • afternoon nap pros and cons
    1/12

    आजच्या धावपळीच्या आयुष्यात आराम मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच दिवसभरात काही वेळ झोप घेतल्याने आपली उत्पादन क्षमता अनेक पटींनी वाढू शकते.

  • 2/12

    नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मते, युनायटेड स्टेट्समधील ३३ टक्क्यांहून अधिक लोक नियमित दुपारची झोप घेतात. दुपारची झोप तुमची चिडचिड कमी करते. म्हणूनच जर तुम्ही कामाच्या वेळेबाहेर काम करत असाल, तर तुम्हाला पुरेशा प्रमाणात आराम मिळत आहे ना? याची खात्री करणे आवश्यक आहे.

  • 3/12

    एक डुलकी घेतल्याने तुम्हाला आठ तासांच्या झोपेइतका ताजेपणा वाटू शकतो. एक लहानशी डुलकी घेतल्याने आपली सतर्कता, स्मरणशक्ती आणि आपला मूड सुधारू शकते. तसेच डुलकी घेण्याचे इतरही अनेक आरोग्य फायदे देऊ शकतात.

  • 4/12

    तथापि, दुपारी झोपण्याचे अनेक फायदे असले तरीही याचे काही तोटेही आहेत. त्यामुळेच, जर तुम्ही दुपारच्या झोपेच्या आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करणार असाल तर तुम्हाला याचे फायदे तोटे माहीत असणे आवश्यक आहे.

  • 5/12

    दुपारची झोप घेण्याचे फायदे

  • 6/12

    दुपारी झोप घेतल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, दुपारी ३० ते ९० मिनिटांची झोप घेतल्यामुळे वृद्ध लोकांच्या स्मरणशक्तीमध्ये सुधार झाल्याचे दिसून आले आहे.

  • 7/12

    दुपारची झोप आपल्या संवेदन प्रणालीमध्ये सुधार घडवून आणते. यामुळे आपल्या उत्तेजक प्रतिक्रियांवर आपण नियंत्रण राखू शकतो. अनेक अभ्यासांमधून असेही सिद्ध झाले आहे की संध्याकाळी झोप घेतल्याने आपण रागावर नियंत्रण मिळवू शकतो.

  • 8/12

    आपण पूर्ण दिवस काम करत असल्याने आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते. काहींना दुपारच्या झोपेची गरज नसते. मात्र दुपारी पुरेशी झोप घेतल्याने आपल्याला ताजेतवाने वाटू शकते आणि पुन्हा नव्याने काम करण्यास आपले शरीर सज्ज होते. यामुळे मेंदूलाही विश्रांती मिळते आणि आपल्याला कामामध्ये लक्ष केंद्रित करायलाही मदत होते.

  • 9/12

    दुपारची झोप घेण्याचे तोटे

  • 10/12

    तुमचे दैनंदिन झोपेचे वेळापत्रक विस्कळीत असल्यास दुपारची झोप टाळावी. कारण यामुळे तुमच्या रात्रीच्या झोपेमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच रात्रीची झोप सुधारण्यासाठी डॉक्टरही दुपारी न झोपण्याचा सल्ला देतात.

  • 11/12

    युनायटेड स्टेट्स नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, दुपारी ९० मिनिटांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्या मध्यमवयीन आणि वृद्ध महिलांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता जवळपास ३९ ते ५४ टक्के अधिक आहे.

  • 12/12

    याच कारणामुळे असे लक्षात येते की दुपारची झोप प्रत्येकासाठी योग्य नाही. विशेषत: निद्रानाशाचा त्रास असणाऱ्यांनी दुपारची झोप घेणे टाळावे. (Photos: Pexels)

TOPICS
लाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: How beneficial is afternoon nap for health know its advantages and disadvantages pros cons pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.