-
मधुमेह हा असा एक मेटाबॉलिक आजार आहे जो रक्तातील ग्लुकोजचा स्तर वाढवण्यासाठी जबाबदार असतो.
-
इन्सुलिन संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शरीराच्या पेशींमध्ये साठवते किंवा त्यांचा ऊर्जा म्हणून वापर करते. मधुमेहाच्या आजारात एकतर शरीर पुरेशा ओरामनात इन्स्युलिन तयार करत नाही किंवा या इन्स्युलिनचा शरीर योग्यप्रकारे वापर करू शकत नाही.
-
मधुमेहावर योग्यवेळी योग्य उपचार न केल्यास शरीराच्या नसा, डोळे आणि किडनीला इजा होऊ शकते.
-
मधुमेहाच्या रुग्णाने हा आजार, त्याचे दुष्परिणाम आणि धोके याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा हा आजार शरीरासाठी घातक ठरू शकतो.
-
मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. मधुमेह रुग्णाच्या आहाराबाबत बोलायचं झाल्यास फळांचा विचार आवर्जून केला जातो.
-
मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोणती फळे खावी, कोणती खाऊ नयेत आणि किती प्रमाणात या फळांचे सेवन करावे याबाबत अनेक संभ्रम आहेत.
-
पपई हे असे एक फळ आहे, जे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अनुकूल मानले जाते. मात्र, पपईचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खरंच फायदेशीर आहे का, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
-
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी पपईचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
-
जास्त प्रमाणात पपईचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. हे फळ मुळातच गोड असते आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स ६० आहे.
-
यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या मते, एका कप ताज्या पपईमध्ये सुमारे ११ ग्रॅम साखर असते. ही साखर रक्तातील साखर वाढवू शकते.
-
फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. हा गोडवा शरीरासाठी निरोगी असतो. हेल्थलाइनने दिलेल्या माहितीनुसार फळे मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो.
-
पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी गोड खाण्याच्या लालसेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते उत्तम आहे. मर्यादित प्रमाणात पपई खाल्ल्याने रक्तातील साखरदेखील कमी होऊ शकते.
-
काही अहवालांनुसार, पपईचा शरीरावर हायपोग्लायसेमिक प्रभावदेखील असू शकतो. या फळामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, जे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहेत. हे अँटिऑक्सिडंट रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
-
हे फळ मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढत नाही. मधुमेही रुग्णांना पपईचे सेवन करायचे असेल तर ते दिवसभरात अर्धी वाटी पपई खाऊ शकता.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो: Pexels)
Photos: मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपई खरंच फायदेशीर? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या सत्य
पपई हे असे एक फळ आहे, जे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अनुकूल मानले जाते. मात्र, पपईचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खरंच फायदेशीर आहे का, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
Web Title: Blood sugar papaya beneficial for diabetic patients know the facts from the experts pvp