-
ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला संपत्ती, वैभव, सुख, ऐश्वर्य आणि ऐशोआराम इत्यादींचा कारक मानण्यात आला आहे.
-
शुक्राच्या राशी परिवर्तनाचा सर्व १२ राशींवर प्रभाव पडतो. शुक्र ग्रह एका राशीत २३ दिवस राहतो. त्यामुळे या कालावधीत शुक्राची स्थिती काय आहे. हे महत्त्वाचं ठरतं.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या नववर्षात शुक्र ग्रह गोचर करून मीन राशीत स्थिर होणार आहे, यामुळे अत्यंत दुर्मिळ व शुभ असा मालव्य राजयोग तयार होत आहे.
-
पंचांगाच्या माहितीनुसार नववर्षातील फेब्रुवारी महिन्यात १५ तारखेला बुधवारी रात्री ८ वाजून १२ मिनिटांनी शुक्राचे गोचर होणार आहे.
-
यानंतर काही काळ शुक्रदेव मीन राशीत प्रवेश करून स्थिर होणार आहेत. जेव्हा अशा प्रकारे कोणताही ग्रह मार्गी होतो तेव्हा अन्य ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार काही शुभ राजयोग तयार होतात असतात.
-
या मालव्य राजयोगाचा तीन राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. या दरम्यान या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो.
-
हा राजयोग तीन राशींसाठी अत्यंत शुभ वार्ता घेऊन येऊ शकतो. त्यांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.
-
मालव्य राजयोग मीन राशीतील लाकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या कुंडलीतील चढत्या घरामध्ये भ्रमण करणार आहे. अविवाहित लोकांकडे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच ज्यांचे लग्न झाले आहे, त्यांचे नाते घट्ट होऊ शकते. या काळात भागीदारीतील कामे फायदेशीर ठरू शकतात.
-
मालव्य राज योगा बनल्यामुळे कर्क राशीतील लाकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीतून नवव्या घरात तयार होईल. जे भाग्य आणि परदेशी स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते. यासोबतच तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसून येऊ शकते.
-
शुक्रदेव वृषभ राशीचे मूळ स्वामी आहेत. यामुळे मालव्य राजयोग असताना या राशीला प्रचंड धनलाभाचे योग आहेत. शुक्र ग्रह हा वैभवदाता मानला जातो व म्हणूनच तुमच्याही भाग्यात येत्या काळात प्रचंड धन, धान्य, समृद्धीचा वर्षाव होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीसाठी येणारा काही काळ अत्यंत शुभ ठरू शकतो.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
‘मालव्य राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? शुक्र देव देऊ शकतात पैसाच पैसा!
Shukra Gochar 2023 in Meen: फेब्रुवारी महिन्यात १५ तारखेला शुक्राचे गोचर होणार असून त्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण ‘या’ तीन राशींसाठी हा योग संपत्ती आणि प्रगतीचा योग घेऊन येणारा आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
Web Title: Shukra gochar creates malavya rajyog god venus will give the opportunity these zodiac signs can get huge money pdb