-
ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा गुरू ग्रह त्यांच्या हालचाली बदलतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एका ठराविक काळाने उदय आणि अस्त होतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना उदय आणि अस्ताची क्रिया सुरू असते.
-
ज्याचा थेट परिणाम १२ राशींवर होताना दिसतो. अनेक ग्रहांच्या उदय काळामुळे शुभ योग तयार होतात, जे काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असतात.
-
गुरु ग्रह एप्रिलमध्ये उदयास येत आहेत. त्यामुळे ‘हंस राजयोग’ तयार होत आहे. सर्व राशीच्या लोकांवर या योगाचा काही ना काही प्रभाव नक्कीच पडेल.
-
ज्योतिषशास्त्रानुसार गुरु राशीपरिवर्तनाचा परिणाम हंस राजयोगात होतो. हंस राजयोग बनल्याने काही राशींसाठी चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता आहे.
-
गुरूचा उदय काही राशींसाठी एक शुभ संकेत आहे. गुरूच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक आणि करिअरच्या आघाडीवर फायदा होईल.
-
ज्योतिष शास्त्रानुसार गुरूचा उदय म्हणजेच हंसराज योग फायदेशीर ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे्त, या भाग्यशाली राशी..
-
हंस राजयोग बनल्याने करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. कारण गुरु तुमच्या राशीतून नवव्या भावात उदयास येईल. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान ठरु शकता. नोकरीच्या चांगल्या ऑफर मिळू शकतात, जे लोक परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरु शकतो.
-
या राशीतील लोकांसाठी हंस राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरू शकते. कारण तुमच्या पारगमन कुंडलीच्या दुसऱ्या घरात गुरूचा उदय होईल. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. यासोबतच आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल. त्याचबरोबर १७ जानेवारीला शनीची साडेसाती संपली आहे. त्यामुळे या काळात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन देखील खरेदी करू शकता.
-
हंस राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण गुरू मीन राशीच्या चढत्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या मदतीने पैसे मिळू शकतात. यासोबतच या गुरूच्या उदयामुळे व्यावसायिकांना चांगले पैसे मिळतील. पण १७ जानेवारीपासून तुमच्यावर शनीची साडेसाती सुरू झाली आहे. त्यामुळे तुम्हाला काही आरोग्य समस्या जाणवू शकतात.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
गुरु ग्रहाच्या उदयामुळं बनतोय ‘हंस राजयोग’; ‘या’ राशींच्या लोकांना देवगुरुच्या कृपेने मिळू शकतो बक्कळ पैसा
Guru Uday 2023: मीन राशीत गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. त्यामुळे ‘हंस’ नावाचा राजयोग तयार होईल. हा योग काही राशींच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत शुभदायक ठरु शकतो.
Web Title: Guru uday 2023 jupiter will make hans rajyog these zodiac sign can get huge amount of money pdb