-
बदलत्या जीवनपद्धतीचा आरोग्यावर चांगला आणि वाईट असा दोन्ही बाजूंनी परिणाम होताना दिसतो.
धावपळीच्या जीवनामुळे बदलत गेलेला आहार आणि त्यामुळे होणारे नुकसान आपण जाणतो. -
इन्संट फूडचा आहारात होणाऱ्या समावेशामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याची समस्या अनेकांना भेडसावते.
-
वाढलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी पौष्टिक आहार करणं आवश्यक आहे.
-
व्हिटॅमिन आणि मिनरल्सने परिपूर्ण पालकचा रोजच्या आहारात समावेश केल्यास त्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.
-
ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, आणि फायबरचे प्रमाण भरपूर असून त्यामुळे हृदय निरोगी राहू शकते तसेच. कोलेस्ट्रॉल देखील कमी होऊ शकतो.
-
हृदय निरोगी ठेवण्यासाठी तसेच रक्त शुद्धीकरणासाठी फायबरने परिपूर्ण अशा गाजराचा समावेश केल्यास ते उपयुक्त ठरू शकते.
-
फायबरयुक्त बीटाचा आहारात समावेश केल्यास रक्तदाब तसेच कोलेस्ट्रॉल दोन्हीही नियंत्रणात राहू शकते.
-
ऍस्परॅगसचा आहारात समावेश केल्यास त्यातील व्हिटॅमिन आणि मिनरल्समुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊ शकते तसेच कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.
-
कोबी हा फायबर, अँटिऑक्सिडेंट्स, आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत असून त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते तसेच शरीरातील रक्तदाबही सुरळीत होऊ शकतो.
-
ब्रुसल्स स्प्राऊट्सचा आहारातील समावेश निरोगी हृदयासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतो.
-
कारल्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास रक्तशुद्धीकरण, कोलेस्ट्रॉल नियंत्रण आणि शरीरातील साखरेचे नियंत्रण यांसारखे फायदे होऊ शकतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)
‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक