-
गेल्या अनेक दिवसांपासून कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाचे आणि त्यांच्या लग्नातील लूकचे वारे वाहत आहेत. त्यातच आणखी भर म्हणून कियाराने आता त्यांच्या संगीत सोहळ्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने घायाळ केलं आहे. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
पुन्हा एकदा मनिष मल्होत्राच्या डिझाईनर कलाकृतीत ही जोडी दिसली. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
डिझायनरच्या म्हणण्यानुसार हा लेहेंगा बनवण्यासाठी तब्बल ४००० तास लागले असून त्यात सोनेरी आणि चंदेरी ट्रांझिशन, ९८००० स्वारोस्की क्रिस्टल आणि मॅराबू पिसाचे डीटेलिंग करण्यात आले आहे. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
कियाराने यावर हिऱ्यांचा घातलेला नेकलेस खास डिझायनरकडून बनवून घेतला असून आणि त्याच्या मध्यभागी मोठं रुबीचे पेंडंट आहे. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
सिद्धार्थने कियाराच्या लेहेंग्याला शोभेल अशी शेरवानी घातली होती आणि त्यावर काळया आणि सोनेरी रंगात जरीकाम केलं असून त्यावर देखील स्वारोस्की खडे जडले होते. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
या आधी जोडीने त्यांचे मेहंदीच्या कार्यक्रमातील फोटो शेअर केले होते ज्यात कियाराने सोनेरी काठ असलेला ऑफ व्हाईट लेहेंगा, मोत्यांची कारागिरी केलेला ब्लाऊज आणि एम्ब्रोयडरी केलेली पिवळ्या रंगाची ओढणी असा पोशाख परिधान केला होता. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
सिद्धार्थने देखील मस्टर्ड येलो रंगाचा बांधणी कुर्ता आणि त्यावर डिझाइनर मनिष मल्होत्राच्या खास कलेक्शनमधील काश्मिरी शाल असा कमाल लूक केला होता. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
लग्नासाठी कियाराने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला स्वारोस्की खडे जडवलेला आणि रोमन स्थापत्यकलेचे जरीकाम केलेला ऑम्ब्रे रंगाचा लेहेंगा परिधान केला होता आणि त्यावर हिरे आणि पाचूंचे दागिने घातले होते. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
सिद्धार्थने लग्नात मेटॅलिक सोनेरी रंगाची शाही शेरवानी घातली होती ज्यावर आयव्हरीचे धाग्यांचे कोरीवकाम, सोनेरी रंगात जर्दोसी काम आणि बादला काम केले होते. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
वेलवेट सॅटिनचा चौकोनी गळ्याचा फिश कट पद्धतीचा गाऊन आणि त्यावर हिरे आणि पाचूजडित उठावदार नेकलेस असा अत्यंत सुंदर लूक कियाराने आपल्या रिसेप्शनसाठी केला होता. (Photo: Manish Malhotra/Instagram)
-
सिद्धार्थने देखील रिसेप्शनसाठी खास वेल्वेटचा सूट बनवून घेतला होता ज्यावर क्रिस्टल वर्क केलं होतं. (Photo: Manish Malhotra/Instagram)
-
(Photo: Kiara Advani/Instagram)
अबब! कियाराचा लेहेंगा बनवण्यासाठी लागले तब्बल ४००० तास; जाणून घ्या, नेमकं काय आहे यातील वेगळेपण
डिझायनरच्या म्हणण्यानुसार हा लेहेंगा बनवण्यासाठी तब्बल ४००० तास लागले असून त्यात सोनेरी आणि चंदेरी ट्रांझिशन, ९८००० स्वारोस्की क्रिस्टल आणि मॅराबू पिसाचे डीटेलिंग करण्यात आले आहे.
Web Title: Kiara sangeet lehenga took 4000 hours to get it done know what special in it mmj 00