-
नोकरी करणाऱ्या महिलांना, विशेषतः नोकरी करणाऱ्या मातांना पैसे कमावण्यापासून, घराची आणि कुटुंबाची देखभाल करण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. मात्र, अनेकदा या जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांची दमछाक होते.
-
काम, घर आणि कुटुंबाची काळजी घेणे या सर्व गोष्टी करताना या महिलांमध्ये प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण निर्माण होतो. मात्र, अशावेळी आपल्या गरजांकडे दुर्लक्ष करणे या महिलांसाठी घातक ठरू शकते.
-
नोकरी करणारी आई म्हणून, प्रत्येक महिलेने आपले मानसिक स्वास्थ्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्याची काळजी घेणे आव्हानात्मक असू शकते. मात्र, काही टिप्सच्या मदतीने या महिलांना आपले मानसिक आरोग्य जपता येऊ शकते.
-
स्वतःसाठी वेळ काढा : स्वतःला आराम मिळण्यासाठी आपल्या दैनंदिन वेळपत्रकात थोडा वेळ राखून ठेवा. या वेळेत तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी करू शकता. उदाहरणार्थ, पुस्तक वाचणे, योगा करणे, फिरायला जाणे, इत्यादी.
-
मर्यादा निश्चित करा : मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला वेळ मिळवा याकरिता आपले काम, सहकर्मचारी, कुटुंबीय यांच्यासाठी काही मर्यादा निश्चित करा.
-
याचाच अर्थ असा की निर्धारित कामपेक्षा अतिरिक्त कामाला किंवा जबाबदाऱ्यांना नाही म्हणायला शिका. घरातील किंवा कार्यालयातील सर्वच कामांचा भार स्वतःवर न घेता तुम्ही ती इतरांना सोपवू शकता.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर काम करणार्या मातांशी संपर्कात राहा, ज्यांना तुमच्यासारखंच या सर्व आव्हानांना सामोरे जावे लागते. यामुळे तुम्हाला एकटे वाटणार नाही.
-
ब्रेक घ्या : दिवसभराच्या कामातून काही वेळ ब्रेक घेणे महत्वाचे आहे. विशेषतः जर तुम्ही घरून काम करत असाल, तर थोडावेळ उठा आणि आपले शरीर मोकळे कर. फिरायला जा किंवा ध्यान करण्यासाठी काही मिनिटे घ्या.
-
नियमितपणे ध्यान किंवा योगा केल्याने तुम्हाला मानसिक तणावाच्या प्रसंगीही शांत राहण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळू शकते.
-
आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये ध्यान करणे, योगा करणे, दीर्घ श्वास घेणे यांसारख्या लहान-लहान गोष्टींचा समावेश केल्यास, आपल्या मानसिक स्वास्थ्याला मजबूत करण्यास मोठी मदत करू शकतात.
-
जर तुम्ही दैनंदिन आयुष्यात प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जात असाल, तर कोणताही संकोच न बाळगता तज्ज्ञांची मदत घ्या. हे तज्ज्ञ तुम्हाला तुमचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करू शकतात.
-
सर्व फोटो : Pexels
Mental Health: नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईच्या मानसिक आरोग्यासाठी ‘या’ गोष्टी अतिशय गरजेच्या
काम, घर आणि कुटुंबाची काळजी घेणे या सर्व गोष्टी करताना या महिलांमध्ये प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण निर्माण होतो. मात्र, अशावेळी आपल्या गरजांकडे दुर्लक्ष करणे महिलांसाठी घातक ठरू शकते.
Web Title: These things are essential for the mental health of every working mother pvp