-
शरीरात होणारे अनेक लहान-लहान बदलही मोठ्या आजाराचे संकेत असू शकतात. अशाच पद्धतीने लघवीमध्ये दिसून येणाऱ्या काही बदलांच्या मदतीने आपण ‘ब्लॅडर कॅन्सर’ सारखा आजार वेळीच ओळखू शकतो.
-
हा आजार ओळखण्यासाठी आपल्याला केवळ काही लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. असे केल्यास आपण हा गंभीर आजार ओळखून त्यावर तातडीने उपचार करू शकतो.
-
अॅक्शन ब्लॅडर कॅन्सर युकेनुसार वेळीच हा आजार ओळखता आल्यास जवळपास ८० टक्के लोक आपला जीव वाचवू शकतात.
-
बहुतेक लोक लघवीमध्ये होणारे बदल ओळखत नाहीत आणि यामुळे शारीरिक स्थिती आणखी गंभीर होऊ लागते. तुम्हाला जर पुढील लक्षणे दिसत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
-
लघवीतून रक्त येणे : एनएचएस यूके यानी डीइलेल्या माहितीनुसार लघवीमध्ये रक्त दिसणे ब्लॅडरचा गंभीर आजार झाल्याचे लक्षण असू शकते.
-
८० टक्के प्रकरणामध्ये हे लक्षण प्रामुख्याने दिसून येते. लघवीसह येणारे रक्त हे गुलाबी किंवा गडद लाल रंगाचे असू शकते. तसेच लघवीतून रक्त आल्यावर वेदना होणे गरजेचे नाही.
-
सतत लघवीला होणे : जर तुम्हाला सतत लघवीला होत असेल किंवा आकानक लघवीला होणार असल्याचे जाणीव होत असेल, तर हे ‘ब्लॅडर कॅन्सर’चे लक्षण असू शकते.
-
कंबर दुखणे : लघवी करत असताना जळजळ होण्याबरोबरच ओटीपोटी वेदना होणे, थकवा जाणवणे, त्याचबरोबर भूक कमी लागणे आणि हाडे दुखणे अशी लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
-
‘ब्लॅडर कॅन्सर’ या गंभीर आजारपासून स्वतःचा बचाव कसा करावा?
-
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार जास्त पाणी प्यावे. भरपूर पाणी प्यायल्याने ब्लॅडर कॅन्सरचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
-
आपला आहार जितका निरोगी असेल, तितकाच हा आर होण्याचा धोका कमी राहील. विशेषतः धूम्रपान करणाऱ्यांना ब्लॅडर कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. म्हणून ही सवय सोडावी.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Freepik)
लघवीमध्ये दिसणारे ‘हे’ बदल म्हणजे धोक्याची घंटा! Bladder Cancer पासून वाचण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
लघवीमध्ये दिसून येणाऱ्या काही बदलांच्या मदतीने आपण ‘ब्लॅडर कॅन्सर’ सारखा आजार वेळीच ओळखू शकतो.
Web Title: These changes seen in urine are very dangerous follow these tips to prevent bladder cancer pvp