• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. skincare tips amazing skin benefits of having bell pepper pvp

Photos: भोपळी मिरची खा अन् त्वचेच्या ‘या’ समस्यांपासून सुटका मिळवा

असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्या त्वचेसाठी गुणकारी ठरू शकतात. भोपळी मिरचीही याच पदार्थांपैकी एक आहे.

June 7, 2023 11:18 IST
Follow Us
  • bell-pepper-skin-benefits
    1/15

    त्वचेचे बाहेरून संरक्षण करण्याबरोबरच तिची आतूनही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. या कडाक्याच्या उन्हाळ्यात समतोल, पौष्टिक आणि समृद्ध आहार घेतल्यास त्वचेचे तेज टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • 2/15

    असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्या त्वचेसाठी गुणकारी ठरू शकतात. भोपळी मिरचीही याच पदार्थांपैकी एक आहे. आज आपण भोपळी मिरचीचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.

  • 3/15

    >> ‘व्हिटॅमिन सी’चा उत्तम स्त्रोत

  • 4/15

    भोपळी मिरची हा व्हिटॅमिन सीचा सर्वोच्च स्त्रोत मानला जातो. हिरवी, लाल किंवा पिवळी अशा सर्व प्रकारची भोपळी मिरची या व्हिटॅमिनचे जबरदस्त स्त्रोत आहेत.

  • 5/15

    त्वचेची रचना आणि लवचिकता राखणारे प्रथिने कोलेजन तयार करण्यात आणि त्वचा निरोगी ठेवण्यात व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका बाजावते.

  • 6/15

    >> नैसर्गिकरित्या त्वचा हायड्रेट करते

  • 7/15

    भोपळी मिरची ही आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ करू शकणार्‍या पदार्थांपैकी एक आहे. ते तुमच्या शरीराला आतून पोषण करण्यास मदत करू शकतात कारण यामध्ये 92% पर्यंत पाण्याचे प्रमाण असू शकते.

  • 8/15

    >> चेहऱ्याचे तेज वाढवते

  • 9/15

    त्वचेचे नैसर्गिक तेज हे त्वचेला चांगले पोषण मिळत असल्याचे एक उत्तम लक्षण आहे. भोपळी मिरचीमधील व्हिटॅमि सी त्वचेवरील वृद्धतवाच्या खुणा कमी करण्यास प्रभावी ठरू शकते.

  • 10/15

    >> त्वचेच्या समस्या दूर होतात

  • 11/15

    तुम्हीही त्वचेच्या वारंवार समस्यांमुळे त्रस्त असाल तर तुम्ही दैनंदिन आहारात भोपळी मिरचीचा समावेश करू शकता. भोपळी मिरची अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे.

  • 12/15

    भोपळी मिरचीच्या सेवनाने तुमची खराब झालेली त्वचा लक्षणीयरित्या सुधारू शकते. इतकेच नाही तर त्वचेची सूज आणि कोरडी त्वचा कमी होऊ शकते.

  • 13/15

    >> प्रदूषण आणि अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण

  • 14/15

    भोपळी मिरचीमधील अँटिऑक्सिडंट्स अतिनील किरण आणि इतर वायुजन्य दूषित घटकांच्या हानिकारक प्रभावांपासून त्वचेचे संरक्षण करतात. याच्या सेवनाने त्वचेचा पोत वाढवता येतो.

  • 15/15

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. वरील उपायांचा वापर करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Skincare tips amazing skin benefits of having bell pepper pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.