• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. no relief from stress gaur gopal das effective mantra to stay away from stress management mental health tips pvp

“तणावापासून सुटका नाही, मात्र…”; स्ट्रेसपासून लांब राहण्यासाठी गौर गोपाल दास यांनी सांगितला प्रभावी मंत्र

गौर गोपाल दास म्हणतात की, आपण तणावापासून मुक्त होऊ शकत नाही, परंतु कमीतकमी आपण स्वतःला कधीकधी यापासून दूर ठेवू शकतो.

July 3, 2023 11:03 IST
Follow Us
  • gaur-gopal-das-stress-management
    1/13

    प्रसिद्ध प्रवक्ते गौर गोपाल दास काही दिवसांपूर्वीच इंडियन एक्सप्रेसच्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात इंडियन एक्सप्रेसचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका आणि अनु मलिक यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी गौर गोपाल दास यांनी मानवता आणि तणाव या विषयावर भाष्य केले.

  • 2/13

    इंडियन एक्स्प्रेसचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांनी त्यांना विचारले होते की, आजकाल लोकांच्या वेगवेगळ्या वागणुकीमुळे आपल्याला लोकांमधील चांगुलपणा शोधणे कठीण होते? या प्रश्नाचे उत्तर देताना गौर गोपाल दास यांनी म्हटले, “हे क्लोनचे जग आहे का? तुम्हाला क्लोनच्या जगात राहायचे आहे का जेथे प्रत्येकाने प्रत्येक तपशीलावर प्रत्येकाशी सहमत असणे आवश्यक आहे?”

  • 3/13

    “की आपल्याला आपले स्वतःचे व्यक्तिमत्व असणे आवश्यक आहे आणि प्रत्येकाला आदरपूर्वक असहमत असण्याची मुभा असणे आवश्यक आहे. ” गौर गोपाल दास पुढे म्हणाले, “संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे, मतभेद हा जीवनाचा एक भाग आहे, परंतु लोकांच्या अंतर्गत खास बाजूंशी जोडणे देखील खूप महत्वाचे आहे आणि म्हणूनच मी बर्याचदा म्हणतो, ‘माणूस प्रत्येक घरात जन्माला येतो, मात्र माणुसकी कुठेतरीच जन्माला येते.’

  • 4/13

    गौर गोपाल दास पुढे म्हणाले, “काही लोक आपल्या प्रिय व्यक्तींना त्यांच्या स्वप्नांसाठी सोडतात तर काही लोक त्यांच्या प्रियजनांसाठी त्यांची स्वप्ने सोडतात. आपण या जगात इतरांना प्रभावित करण्यासाठी आलो नाही, तर आपण स्वतःला व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. लोकांना जग जाणून घ्यायचे आहे, परंतु ते नक्की काय काय आहे हे कोणालाही माहीत नाही.”

  • 5/13

    तणाव आणि आघाताशी संबंधित एका प्रश्नावर गौर गोपाल दास म्हणाले, “आपल्या जुन्या आठवणी, आपला ताण, आपल्यासोबत जे काही घडले ते आपण आपल्या मनात ठेवून वावरत असतो. आपण एखाद्या गोष्टीला धरून राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या जीवनावर नक्कीच होणार.”

  • 6/13

    त्यांनी पुढे म्हटलंय, “लोक तणावाने त्रस्त असतात. याचं कारण ताण मोठा असतो हे नसून लोकांना ते फार काळ विसरायचे नसते, हे आहे. लोक सतत त्याचा विचार करत राहतात.”

  • 7/13

    “यामुळेच या गोष्टींशी सामना करण्याची शक्ती आपण गमावून बसतो आणि त्यातून कसे बाहेर पडायचे हेच आपल्याला समजत नाही. याचा परिणाम असा होतो की हा तणाव आपल्या आकलन शक्तीवर नियंत्रण मिळवतो.”

  • 8/13

    गौर गोपाल दास म्हणतात की, आपण तणावापासून मुक्त होऊ शकत नाही, परंतु कमीतकमी आपण स्वतःला कधीकधी यापासून दूर ठेवू शकतो. आपल्याला मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवण्यासाठी मेंटल डिटॉक्स हे खूप महत्वाचे आणि आवश्यक आहे. यामध्ये ध्यान करणे फायदेशीर ठरते.

  • 9/13

    तणावातून मुक्त होण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे यासाठी जर्नलिंग करणे देखील फायदेशीर आहे. जर्नलिंग हा तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे.

  • 10/13

    याशिवाय गौर गोपाल दास यांनी जीवनातील रहस्ये, मूल्ये आणि जीवन जगण्याचे मार्ग देखील सांगितले. गौर गोपाल दास एक संन्यासी आहेत. आध्यात्मिक आणि आधुनिक समाजातील दरी कमी करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केल आहे.

  • 11/13

    गौर गोपाल दास यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी काही काळ एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामही केले आहे. पण त्यांचे मन तिथे रमले नाही. त्यांनी आपली नोकरी सोडून जीवनातील रहस्य शोधण्याचा मार्ग निवडला.

  • 12/13

    मुंबईतील एका आश्रमात 25 वर्षे वास्तव्य करून त्यांनी धार्मिक ग्रंथ, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत, ज्यात ‘लाइफ्स अमेझिंग सिक्रेट्स: हाऊ टू फाइंड बॅलन्स अँड पर्पज इन युवर लाइफ (2018)’ हे पुस्तक खूप चर्चेत होते.

  • 13/13

    गौर गोपाल दास जीवनशैली प्रशिक्षक म्हणून जगभर फिरतात. विद्यापीठे, ग्लोबल फार्म्स, धर्मादाय संस्था आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी आपले मत व्यक्त केले आहेत.

TOPICS
मानसिक आजारMental Illnessमानसिक आरोग्यMental Health

Web Title: No relief from stress gaur gopal das effective mantra to stay away from stress management mental health tips pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.