Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. parents child relationship child never be unhappy if parents should do these things for children ndj

पालकांनो ही कामे करा, तुमची मुलं कधीच राहणार नाही दु:खी

Parents Child Relationship : पालकांनो जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या मुलांनी तुमच्याबरोबर सर्व गोष्टी शेअर कराव्यात आणि त्यांनी नेहमी आनंदी राहावं, तर या काही गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

August 24, 2023 18:40 IST
Follow Us
  • आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी नेहमी काळजी असते. मुलांनी नेहमी आनंदी राहावे आणि मनातील सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर कराव्यात अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते, पण अनेकदा मुलं आई-वडिलांजवळ व्यक्त होत नाही आणि अनेक गोष्टी मनात ठेवतात; ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर दिसून येतो. (Photo : Pexels)
    1/9

    आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी नेहमी काळजी असते. मुलांनी नेहमी आनंदी राहावे आणि मनातील सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर कराव्यात अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते, पण अनेकदा मुलं आई-वडिलांजवळ व्यक्त होत नाही आणि अनेक गोष्टी मनात ठेवतात; ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर दिसून येतो. (Photo : Pexels)

  • 2/9

    पालकांनो जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या मुलांनी तुमच्याबरोबर सर्व गोष्टी शेअर कराव्यात आणि त्यांनी नेहमी आनंदी राहावं, तर या काही गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Pexels)

  • 3/9

    दररोज रात्री कमीत कमी अर्धा तास मुलांबरोबर संवाद साधावा. त्यांचा दिवस कसा गेला, याविषयी विचारपूस करावी. (Photo : Pexels)

  • 4/9

    मुलांबरोबर मैत्रीचे नाते निर्माण करावे, ज्यामुळे ते त्यांच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या अडचणी, चांगल्या-वाईट गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करू शकतात. (Photo : Pexels)

  • 5/9

    मुलांबरोबर तुम्ही जितके जास्त प्रेमाने वागता, तितके ते तुमच्याजवळ येतात; त्यामुळे मुलांना रागावणे टाळा. (Photo : Pexels)

  • 6/9

    मुलांबरोबर बोला आणि त्यांची बाजू समजून घ्या. त्यांचे चुकले असले तर त्यांना प्रेमाने समजून सांगा. (Photo : Pexels)

  • 7/9

    मुलांवर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकू नका. एखाद्या विषयामध्ये कमी गुण मिळाले तर त्यांच्याबरोबर बोला. त्यांची अडचण समजून घ्या, पण परिक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून त्यांना ओरडू नका. (Photo : Pexels)

  • 8/9

    मुलांवर अभ्यास करण्यासाठी दबाव टाकू नका. या कारणामुळे अनेकदा मुलं वैतागू शकतात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. (Photo : Pexels)

  • 9/9

    जर तुम्ही एखादे चांगले काम केले आणि कोणी तुमचं कौतुक केलं तर तुम्हाला त्यातून प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे मुलांनी केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींचे तुम्ही कौतुक केले, तर त्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. (Photo : Pexels)

TOPICS
पालकParentsपालघर न्यूजPalgharमुलेChildrenरिलेशनशिपRelationshipलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Parents child relationship child never be unhappy if parents should do these things for children ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.