• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. talk therapy can help to reduce depression and risk of heart attack risk healthy lifestyle ndj

‘टॉक थेरपी’मुळे डिप्रेशन आणि हार्ट अटॅकचा धोका कसा कमी होतो?

एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, सहानुभूती दाखवीत रुग्णांबरोबर बोलण्यामुळे आणि आत्मविश्वास वाढवणारा संवाद साधल्यामुळे नैराश्याचा सामना करण्यात मदत होऊ शकते; ज्यामुळे हार्टच्या आजारांचा धोकासुद्धा कमी होऊ शकतो.”

September 10, 2023 19:30 IST
Follow Us
  • ताणतणाव हा जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. ऑफिसचे काम, कौटुंबिक टेन्शन, अपुरी झोप आणि वाढत्या आरोग्याच्या समस्यांमुळे नैराश्य आणि हार्टसंबंधीच्या आजारांचा धोका वाढला आहे. (Photo : Freepik)
    1/9

    ताणतणाव हा जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. ऑफिसचे काम, कौटुंबिक टेन्शन, अपुरी झोप आणि वाढत्या आरोग्याच्या समस्यांमुळे नैराश्य आणि हार्टसंबंधीच्या आजारांचा धोका वाढला आहे. (Photo : Freepik)

  • 2/9

    विशेष म्हणजे नैराश्य आलेल्या लोकांनाच हार्टसंबंधीच्या आजारांचा धोका ७२ टक्क्यांपर्यंत जास्त वाढला आहे. पण, ‘युरोपियन हार्ट जर्नल’च्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, सायकोलॉजिकल हस्तक्षेपामुळे नैराश्यापासून होणारा हार्टच्या आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो. (Photo : Freepik)

  • 3/9

    पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI) चे प्रोफेसर, कार्डिओलॉजिस्ट डॉ. के. श्रीनाथ रेड्डी सांगतात, “एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, सहानुभूती दाखवीत रुग्णांबरोबर बोलण्यामुळे आणि आत्मविश्वास वाढवणारा संवाद साधल्यामुळे नैराश्याचा सामना करण्यात मदत होऊ शकते; ज्यामुळे हार्टच्या आजारांचा धोकासुद्धा कमी होऊ शकतो. (Photo : Freepik)

  • 4/9

    फार पूर्वीपासून हृदय आणि मेंदूचा एकमेकांशी संबंध दिसून आलेला आहे. सायकोथेरप्युटिक (Psychotherapeutic) हस्तक्षेपांमुळे हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. अचानक हार्ट अटॅक येणे, हे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप वेदनादायक असू शकते. (Photo : Freepik)

  • 5/9

    गंभीर आजार, अतिप्रमाणात खर्च व भविष्याची भीती यांमुळे नैराश्याचाही धोका वाढतो. त्याविषयी सायकोलॉजिस्ट डॉ. किंजल गोयल सांगतात की फक्त हार्ट अटॅकच नाही तर हार्टशी संबंधित आजारांसाठीसुद्धा नैराश्य जबाबदार असू शकते. (Photo : Freepik)

  • 6/9

    डॉ. गोयल सांगतात की, पॅनिक अटॅक हा कधी कधी हार्ट अटॅकसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. अशा प्रकरणांमध्ये हार्ट स्पेशॅलिस्ट व सायकोलॉजिस्ट यांनी आजाराचे कारण ओळखण्यासाठी एकत्र काम करणे गरजेचे आहे. (Photo : Freepik)

  • 7/9

    सायकोलॉजिस्ट स्ट्रेस ओळखू शकतात आणि एकदा समस्या ओळखली की, रुग्णांबरोबर संवाद साधला जाऊ शकतो. त्यालाच टॉक थेरपी म्हणतात. ही थेरपी खूप चांगले काम करू शकते. (Photo : Freepik)

  • 8/9

    मानसिक ताणतणावामुळे भारतात पाश्चिमात्य देशांपेक्षा कमी वयात हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. आरोग्य, कार्यक्षमता व भविष्यातील आरोग्याच्या समस्या यामुळे हे लोक सहजपण नैराश्यग्रस्त होतात. नैराश्य आलेल्या रुग्णांना एखादी सामान्य व्यक्तीसुद्धा टॉक थेरपी देऊ शकते. प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्यांकडेही हे कौशल्य असणे आवश्यक आहे. (Photo : Freepik)

  • 9/9

    डॉ. गोयल सांगतात, “सायकोलॉजिस्ट म्हणून आम्ही नैराश्यासारख्या समस्येवर मात करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. हार्टच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी किंवा नैराश्याचा सामना करीत असलेल्या लोकांनी ऑनलाइन सत्रे, सायकोलॉजीचे शिक्षण आणि कार्डिओलॉजीच्या क्लिनिकमध्ये जाऊन स्क्रीनिंग चाचण्या करणे आवश्यक आहे.” (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहार्ट अटॅकHeart Attackहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Talk therapy can help to reduce depression and risk of heart attack risk healthy lifestyle ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.