-
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, हस्तमैथुनाबाबत कुणीही मोकळेपणाने बोलत नाहीत. वास्तविक पाहता जास्तीत जास्त लोकं हस्तमैथुन करतात, पण यावर बोलायला लाजतात.
-
हस्त मैथुन हे मानसिक तानतनाव कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे, असं म्हटलं जाते. ज्या ताणतणावामुळे प्रतिकारक्षमता कमी होते तो तणाव घालवण्यासाठी हस्तमैथुनाचा उपयोग होतो.
-
तसेच याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमजही असतात. अनेकजण याला चुकीचं मानतात. पण तज्ज्ञ सांगतात की, यात चुकीचं काही नसून ही एक नैसर्गिक क्रिया आहे. तसेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण प्रमाण अधिक असू नये, असेही सांगतात.
-
हस्तमैथुन याचा अर्थ व्यक्ती आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून ‘शरीर’सुखाचा आनंद घेते. हस्तमैथुन करताना व्यक्ती काही कल्पना डोळ्यांसमोर आणून, शरीरसुखाचा विचार करून स्वतःला उत्तेजित करून वीर्यस्खलन करतात.
-
प्रत्येक व्यक्ती ही प्रक्रीया वेगवेगळ्या पद्धतीने करते. पण का हस्तमैथुन केल्यानं खरंच पुरूषांच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होते का? तसेच याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो का? यावर अनेकांना प्रश्न पडतो.
-
संभोग दरम्यान पुरुष जे शुक्राणू किंवा वीर्य सोडतो त्यात सामान्यपेक्षा कमी शुक्राणू असतात आणि या स्थितीला ऑलिगोस्पर्मिया म्हणतात. पुरूषांमधील स्पर्म महिलांच्या अंडाशयामध्ये जातात.
-
जेव्हा शुक्राणूंची संख्या सामान्यापेक्षा कमी असतं तेव्हा पुरूषांचे अंड पेनिट्रेट करू शकत नाहीत त्यामुळे पुरूषांमध्ये वंध्यत्नव येते. पुरुषांच्या वीर्यातून जे निघते त्याला स्पर्म, लिक्विड किंवा प्रोस्टाग्लॅंडिन असे म्हटले जाते.
-
अंडकोषात वीर्याचे निरंतर उत्पादन होते. पौगंडावस्थेनंतर पुरुषाचे शरीर वीर्य निर्मिती करत राहते. यापासून सुटका मिळवण्यासाठी पुरुष मंडळी हस्तमैथुन करतात.
-
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हस्तमैथुन आणि शुक्राणूंची कमी संख्या यांच्यात कोणताही संबंध नाही. तज्ज्ञ सांगतात, हस्तमैथुनमुळे वीर्य कमी होत नाही.
-
कारण, आपल्या शरीरात दररोज वीर्य निर्माण होत असते. हे त्याप्रमाणे बाहेरही निघते. वीर्याची कमतरता दूर करण्यासाठी कोणी हस्तमैथुन करणे सोडले तरी त्याच्या शरीरात शुक्राणूंची कमतरता असू शकते.
-
प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार वीर्य दररोज तयार होते. ते त्या ग्रंथीमध्ये भरले की बाहेरही येते.
-
जर एखाद्या पुरुषाला वर्षभर तरी शारीरिक संबंधांची कधी इच्छाच झाली नसेल त्यामुळे संबंध ठेवले नसतील तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. तसंच जर एक वर्ष शारीरिक संबंधांनंतरही गर्भधारणा होत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करायला हवा. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक)
हस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो? डॉक्टरांनी दिलं उत्तर…
Low Sperm Count: हस्तमैथुनाबाबत कुणीही मोकळेपणाने बोलत नाहीत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण का हस्तमैथुन केल्यानं शुक्राणूंची संख्या खरंच कमी होऊ शकते का…? जाणून घ्या डाॅक्टरांचे मत…
Web Title: Low sperm count fertility effect of repeated semen ejaculation on sperm quality pdb