Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. if you are a diabetic and eating sweets in diwali follow diet tips ndj

Diabetes : तुम्हाला मधुमेह आहे, पण दिवाळीत गोड खाताय? तज्ज्ञांनी सांगितल्या खास डाएट टिप्स

दिवाळीमध्ये मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डॉ. इंगळे यांनी काही खास डाएट टिप्स सांगितल्या आहेत.

November 15, 2023 14:14 IST
Follow Us
  •  know diet tips in diwali
    1/9

    दिवाळी म्हणजे चैतन्याचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीला गोड पदार्थ बनवले जातात. गोड पदार्थांशिवाय दिवाळी अपूर्ण असते. गोड पदार्थ आवडणाऱ्या लोकांची दिवाळीत खूप मजा असते.
    तुम्हाला जर मधुमेह असेल, पण तुम्हाला गोड पदार्थ खायला आवडत असेल, तर दिवाळीत आरोग्य जपत आहार कसा घ्यायचा, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉ. फराह इंगळे यांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती दिली आहे. (Photo : freepik)

  • 2/9

    दिवाळीत सगळीकडे गोड पदार्थांचे सेवन केले जाते, अशात मधुमेह असणाऱ्या लोकांना गोड पदार्थ खायला मनाई करणे खूप कठीण जाते. याविषयी डॉ. इंगळे सांगतात, “दिवाळीनंतर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून सणासुदीच्या काळात मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहाराबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. दिवाळीत किती प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण मिठाई खाऊ शकतात, हे त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून आहे.” (Photo : freepik)

  • 3/9

    दिवाळीमध्ये मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डॉ. इंगळे यांनी काही खास डाएट टिप्स सांगितल्या आहेत. (Photo : freepik)

  • 4/9

    कोणताही पदार्थ खाताना लहान प्लेटमध्ये खा. साखरेऐवजी नैसर्गिक गोड पदार्थ वापरा.दारूचे अतिसेवन करू नका. दिवाळीत अनेक जण क्षमतेच्या पलीकडे काम करतात, ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. मधुमेह असणाऱ्या लोकांनी जास्त काम करू नये. आराम करावा, नियमित योगा करावा. (Photo : freepik)

  • 5/9

    दिवाळीत चुकूनही उपवास करू नका. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची साखरेची पातळी कमी होऊ शकते आणि तुम्हाला चक्कर येऊ शकते. त्यामुळे वेळेवर जेवण करणे गरजेचे आहे. गोड पदार्थ खाणे टाळा. (Photo : freepik)

  • 6/9

    चालणे, पोहणे, सायकल चालवणे यासारखे व्यायाम करा आणि आरोग्याची काळजी घ्या. आहारात फळे, भाजीपाला आणि सॅलेडचा समावेश करा.दोन तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नका. थोडे थोडे खात राहा. (Photo : freepik)

  • 7/9

    भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी आणि ताकाचे सेवन करा.चहा, कॉफी, दारू किंवा कोल्ड्रिंक्सचे सेवन कमी करा.नियमित डॉक्टरांकडे जाऊन साखरेची पातळी तपासा. (Photo : freepik)

  • 8/9

    डॉ. इंगळे सांगतात, “फायबरयुक्त आहार घ्या. गहू, बाजरी, तांदूळ, राजगिऱ्याचा आहारात समावेश करा. खिचडी, पुलाव, डोसा, मखाण्याची खीर खा. शिंगाड्याच्या पिठापासून चपाती, पुरी आणि समोसा बनवून खा. (Photo : freepik)

  • 9/9

    डॉ. इंगळे पुढे सांगतात, “जर तुम्ही घरी मिठाई बनवत असाल तर फॅटयुक्त दुधाऐवजी स्किम्ड दुधाचा वापर करा. साखरेऐवजी नैसर्गिक साखरेचा वापर करा. पदार्थ तळण्याऐवजी भाजून खा. भरपूर पाणी आणि ताक प्या, हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अधिक फायदेशीर आहे.” (Photo : freepik)

TOPICS
मधुमेहDiabetesलाइफस्टाइलLifestyleहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: If you are a diabetic and eating sweets in diwali follow diet tips ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.