• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sanitary pads cause rashes how to take care while using menstrual pads ndj

महिलांनो, सॅनिटरी पॅडमुळे अ‍ॅलर्जी होते का? मासिक पाळीदरम्यान पॅड वापरताना कोणती काळजी घ्यावी?

सॅनिटरी पॅड्स घालण्याबाबत आणि ते बदलण्यात थोडी जरी चूक झाली तरी सॅनिटरी पॅडमुळे योनीच्या आजूबाजूला पुरळ येणे, खाज सुटणे, सूज येणे लालसरपणा जाणवणे इत्यादी विपरी परिणाम दिसून येतात. अशा वेळी महिलांनी काय करावे आणि मासिक पाळीदरम्यान पॅड वापरताना कोणती काळजी घ्यावी हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

January 10, 2024 18:59 IST
Follow Us
  • Sanitary pads cause rashes
    1/9

    मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. अशात मासिक पाळीदरम्यान महिला सॅनिटरी पॅड आवर्जून वापरतात आणि एका विशिष्ट वेळेनंतर हे पॅड बदलतात; पण पॅड्स घालण्याबाबत आणि ते बदलण्यात थोडी जरी चूक झाली तरी सॅनिटरी पॅडमुळे योनीच्या आजूबाजूला पुरळ येणे, खाज सुटणे, सूज येणे लालसरपणा जाणवणे इत्यादी विपरी परिणाम दिसून येतात. अशा वेळी महिलांनी काय करावे आणि मासिक पाळीदरम्यान पॅड वापरताना कोणती काळजी घ्यावी हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 2/9

    त्वचातज्ज्ञ तिशा सिंग सांगतात, “सॅनिटरी पॅड घातल्यामुळे अनेकदा काही महिलांना पुरळ येणे, खाज सुटणे, लालसरपणा जाणवणे अशी इत्यादी संक्रमणे दिसून येतात. अशात महिलांच्या योनीच्या भागात पुरळमध्ये घर्षण झाल्यामुळे, ओलावा निर्माण होऊन जीवाणू तयार होतात.” (Photo : Freepik)

  • 3/9

    सॅनिटरी पॅड हे अनेक पदार्थांपासून बनवले जातात; जे त्वचेला हानिकारक असू शकतात. त्यामुळे पुरळ येण्याची दाट शक्यता असते. जेल, वूड सेल्युलोज व कापूस या घटकांशिवाय पॉलिओलेफिन्स पॅडमध्ये असतात; ज्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.
    डॉ. सिंग पुढे सांगतात, “पॅड्सची रक्त शोषण्याची क्षमता वाढवण्यासाठी रसायनांचा वापर करून ब्लिच केले जाते आणि या ब्लिचमध्ये डाय-ऑक्सिन असते. जेव्हा पॅड रक्ताच्या संपर्कात येतात तेव्हा हे ब्लिच डाय-ऑक्सिन व मिथेन वायू सोडतात आणि त्यामुळे महिलांना पुरळ आणि संक्रमण होते. (Photo : Freepik)

  • 4/9

    हैदराबाद येथील सिटीझन्स स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार त्वचातज्ज्ञ डॉ. शालिनी पटोडिया द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “ए आयसोमिथिल आयनोन (α-isomethyl ionone), बेन्झिल सॅलिसिलेट (benzyl salicylate), हेक्सिल सिनॅमलडेहाडइ (hexyl cinnamaldehyde) व हेलिओट्रोपिन (heliotropine) ही चार त्वचेशी संबंधित रसायने आहेत; जी सुगंध येण्यासाठी वापरली जातात. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्स, तसेच टॅम्पून्समध्ये असणाऱ्या रसायनांमुळे महिलांना नकळत अॅलर्जी होऊ शकते.” (Photo : Freepik)

  • 5/9

    डॉ. शालिनी पटोडिया पुढे सांगतात, “खरं तर मुळात पॅड पांढरा दिसण्यासाठी ब्लिचचा वापर केला जातो. त्याशिवाय पॅडमध्ये रक्त शोषून घेण्यासाठी अ‍ॅक्रिलेटचा वापर केला जातो. जेव्हा अनेक रसायंनाबरोबर अ‍ॅक्रिलेटचा वापर होतो तेव्हा काहीही परिणाम होत नाही; पण जेव्हा काही ब्रॅण्डमध्ये अ‍ॅक्रिलेटचा वापर कमी रसायनांबरोबर केला जातो तेव्हा अ‍ॅलर्जी होऊ शकते.” (Photo : Freepik)

  • 6/9

    त्वचातज्ज्ञ सिंग यांनी मासिक पाळीदरम्यान पॅड वापरताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी सविस्तर सांगितले आहे.नियमितपणे कॉटनचे अंतर्वस्त्र घालावे. कॉटनचे कापड घाम शोषून घेते; ज्यामुळे पुरळ होत नाही आणि दुसरे म्हणजे सैल कपडे परिधान करा. कॉटनचे अंतर्वस्त्र घातल्यामुळे त्वचेला मोकळी हवा मिळते; ज्यामुळे घाम किंवा पुरळ येत नाही. (Photo : Freepik)

  • 7/9

    हल्ली बाजारात सॅनिटरी पॅड्सचे नवनवीन ब्रॅण्ड आलेले आहेत. अशात जाहिरातीच्या आमिषाला बळी पडू नका आणि तुमच्या त्वचेसाठी योग्य पॅड निवडा. ज्यांना मासिक पाळीदरम्यान पुरळ येत असेल किंवा ज्यांची त्वचा अत्यंत संवेदनशील असेल, अशा लोकांनी कॉटन किंवा ऑरगॅनिक पॅडचा वापर करावा. कारण- त्यात हानिकारक रसायने किंवा रंग नसतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    जर तुमची त्वचा अत्यंत संवेदनशील असेल, तर तुम्ही मेन्स्ट्रुअल कप वापरा. कारण- मेन्स्ट्रुअल कपमुळे तुम्हाला पुरळ येणार नाही. त्याशिवाय सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पून्सपेक्षा मेन्स्ट्रुअल कपमध्ये जास्त रक्त शोषून घेण्याची क्षमता असते. मेन्स्ट्रुअल कप विघटन आणि विल्हेवाट करण्यास सोपा आहे. हे स्वस्त आणि वापरण्याससुद्धा तितकेच सुरक्षित आहेत. (Photo : Freepik)

  • 9/9

    जर तुम्हाला अ‍ॅलर्जी किंवा पुरळ आले असेल, तर क्रिम्स वापरण्याचा सल्ला दिला जातो; ज्यामुळे पुरळ दूर होण्यास मदत होते. पुरळ घालवण्यासाठी कॅलामाइनसारखे लोशन तुम्ही वापरू शकता. पण जर सॅनिटरी नॅपकिन वापरणे बंद केल्यानंतरही पुरळ बरे होत नसेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.योनीचा आजूबाजूचा भाग नेहमी कोरडा आणि स्वच्छ ठेवावा. योनीची योग्य पीएच पातळी साधारणपणे ३ ते ४.५ च्या दरम्यान असावी. ही पातळी कोणत्याही प्रकारच्या जीवाणूंची वाढ थांबवते. (Photo : Freepik)

TOPICS
मासिक पाळीMenstruationलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Sanitary pads cause rashes how to take care while using menstrual pads ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.