-
चिकन किंवा मटण हे प्रथिनांचे भांडार आहेत. संपूर्ण जगात, लोक त्यांच्या आहारात प्रथिनांसाठी चिकनचा सर्वाधिक समावेश करतात. (फोटो : Freepik)
-
बऱ्याच जणांना चिकन मोठ्या प्रमाणात आवडतं. जरी निरोगी आणि चवदार चिकन हे लाखो बॅक्टेरियांची संक्रमित असते. (फोटो : Freepik)
-
तुम्ही विकत आणलेलं चिकन ताजं आहे की नाही हे ओळखणं अनेकदा कठीण असतं. बाजारात आणलं की ते समोरच कापलेलं असतं. त्यामुळे तसं काही चिंता करण्याचं कारण नसतं. (फोटो : Freepik)
-
पण ऑनलाईन किंवा शॉपिंग मॉलमधून घेतलं की कठीण होतं. चला जाणून घेऊयात ताजं चिकन कसं ओळखायचं. (फोटो : Freepik)
-
चिकनचा रंग : तुम्ही जेव्हा ताजं चिकन विकत घेता तेव्हा त्याचा रंग फिकट गुलाबी असतो. पण जेव्हा चिकन खराब होतं तेव्हा त्याचा रंग फिका पडतो, पिवळसर दिसू लागतं. (फोटो : Freepik)
-
चिकनचा वास : सर्वात पहिलं म्हणजे चिकनचा वास घेऊन पाहा, त्याच्यातून विचित्र वास येत असेल ते खराब झालेलं असतं. फ्रेश चिकनचा वास सौम्य असतो. खराब चिकनमध्ये तीव्र, आंबट, सडल्यासारखा वास येतो.(फोटो : Freepik)
-
चिकनचा चिकटपणा : चिकनला स्पर्श केल्यानंतर खूपच चिकटपणा जाणवत असेल तर समजून जा चिकन खराब आहे. चिकन धुतल्यानंतरही चिकटपणा कायम राहत असेल तर याचा अर्थ चिकन खूपच खराब आहे.(फोटो : Freepik)
-
चिकनची चव : ताज्या आणि गोठवलेल्या चिकनची चव खूपच वेगळी असते. त्यामुळे तुम्ही चिकन खात असाल तर तुम्हाली ही बाब लक्षात येईल. तर तुम्हाला खाताना तसं काही जाणवलं तर ते चिकन खाऊ नका.(फोटो : Freepik)
-
रंग बदलणे – फ्रीजमध्ये ठेवलेले चिकन तांबड्या आणि हिरवे झाले तर समजून घ्या की चिकन खराब झाले आहे. यावेळी हे चिकन भरपूर जिवाणूंनी दूषित झालेले असते.(फोटो : Freepik)
तुम्ही आणलेले चिकन ताजे की शिळे कसे ओळखाल? जाणून घ्या..
चिकन दिसतंय ताजं पण खरंच फ्रेश आहे? खराब झाल्यावर काय दिसतात बदल? जाणून घ्या…
Web Title: How to identify fresh chicken buying tips easy hacks to ensure the freshness of raw chicken srk