-
Parenting Tips in marathi: आपली मुलं कशीही असली तरी आई-वडिलांसाठी ती नेहमी एका राजकुमारापेक्षा किंवा राजकन्येपेक्षा कमी नसतात. (Photo: Freepik)
-
मूल जेव्हा लहान असते तेव्हा त्याला शिकवणे आणि संस्कार देणे अधिक सोपे होते. जेव्हा मुलं मोठी होऊ लागतात तेव्हा त्यांचे स्वतंत्र विचार, वागणूक व्यवहार यामध्ये फरक जाणवू लागतो. (Photo: Freepik)
-
वाढत्या वयानुसार त्यांच्या इच्छा आणि भावना व्यक्त करण्याचे नवीन मार्ग ते शोधत असतात. या काळात ते आपला मुद्दा मांडण्यासाठी हट्टीपणाचा करतात. (Photo: Freepik)
-
तुमच्या मुलांमध्येही तुम्हाला असा फरक दिसून येत असेल तर पालक म्हणून तुम्ही नक्की तुमच्या मुलांशी कसे वागायला हवे आणि कशा पद्धतीने मुलांचा हा रागीटपणा आणि उद्धटपणा कमी करता येईल. चला जाणून घेऊयात या सवयी कशा सोडवायच्या. (Photo: Freepik)
-
शांत राहा: मूल जेव्हा हट्ट करतात किंवा रागावतात तेव्हा प्रथम तु्म्ही स्वतःला शांत ठेवा. तुमची शांतता मुलाला शांत करण्यात देखील मदत करेल. (Photo: Freepik)
-
लक्षपूर्वक ऐका: मूल काय म्हणते ते लक्षपूर्वक ऐका. त्यांचे म्हणणे तुम्हाला समजत आहे असे त्यांना वाटले पाहिजे. (Photo: Freepik)
-
समजावून सांगा आणि समजून घ्या: काय योग्य आहे आणि काय नाही हे मुलाला समजावून सांगा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.मुलांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना समजावून सांगितल्यास गोष्टी लवकर पटतात. (Photo: Freepik)
-
सकारात्मक प्रोत्साहन: मुलाच्या चांगल्या वागणुकीची प्रशंसा करा. हे त्यांना कळेल की चांगल्या वागणुकीचे कौतुक केले जाते. ते पुढे सुद्धा तसंच वागण्याचा प्रयत्न करतील. (Photo: Freepik)
-
नियम आखा : चांगल्या आयुष्यासाठी नियम पाळणे आणि अनुशासन असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल शिस्तबद्ध असावे असेच वाटते आणि त्यासाठी योग्य नियम आणि गोष्टींचे पालन करणेही गरजेचे आहे. (Photo: Freepik)
Parenting Tips: तुमची मुलंही हल्ली रागीट होत चाललीयेत? रागीट मुलांना असे करा शांत
Parenting Tips in marathi: रागीट आणि उद्धट होतंय तुमचं मूल? रागावण्यापेक्षा अशा पद्धतीने हाताळा परिस्थिती लगेच दिसेल फरक
Web Title: Parenting tips how to deal with disrespectful angry child positive parenting tips for stubborn kids srk