-
आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांचे पालनपोषण करणे पालकांसाठी खूप आव्हानात्मक आहे. (Photo : Freepik)
-
प्रत्येक पालकाला वाटते की आपल्या मुलाला योग्य शिकवण मिळावी आणि आपल्या मुलांनी चांगली व्यक्ती म्हणून समाजात नाव कमवावे. (Photo : Freepik)
-
घर, ऑफिसची जबाबदारी सांभाळताना मुलांकडे लक्ष देणं आणि त्यांना वेळ देणं पालकांना कठीण जात आहे. पण एका आगळ्या वेगळ्या पॅरेंटिंग पद्धतीचा वापर करून तुम्ही मुलांबरोबरचे नाते घट्ट करू शकता. (Photo : Freepik)
-
माइंडफुल पॅरेंटिंगचा वापर करून मुलांबरोबरचे नाते पालक घट्ट करू शकतात पण, माइंडफुल पॅरेंटिंग म्हणजे काय? आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
माइंडफुल पॅरेंटिंगच्या मदतीनं मुलांमध्ये सहानभूती निर्माण होते. मुलांच्या मनातील गोष्टी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यासाठी माइंडफुल पॅरेंटिंगचा वापर करून मुलं आणि आईवडिलांमध्ये असं घट्ट नातं निर्माण होतं की, मुलं सर्व गोष्टी त्यांच्याशी शेअर करतात. (Photo : Freepik)
-
पालकांनी मुलांबरोबर विचारपूर्वक संवाद साधावा. अनेकदा तणावामध्ये असताना पालक मुलांसमोर नकारात्मक भावना व्यक्त करतात; ज्याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे पालकांनी नेहमी सकारात्मक गोष्टींवर मुलांबरोबर चर्चा करावी. (Photo : Freepik)
-
माइंडफुल पॅरेंटिंगमध्ये मुलांच्या मनातील भावना लगेच कळतात. अनेकदा मुलं वेगवेगळ्या भावना व्यक्त करतात; ज्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे कळत नाही. पालकांनी अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि त्यांना जाणीव करून द्यावी की, त्यांच्या भावना तुम्ही समजू शकता. (Photo : Freepik)
-
मुलांबरोबर मनमोकळा संवाद साधा. त्यामुळे मुलंही तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करतील आणि ती कधीही खोटं बोलणार नाहीत. मुलांबरोबर मैत्री करा. ती आनंदी राहतील यासाठी नेहमी प्रयत्न करा. (Photo : Freepik)
-
मुलांसाठी काय चांगलं आहे आणि काय नाही, हे त्यांना समजून सांगा आणि त्यावेळी त्यांच्याशी प्रेमाने बोला; ज्यामुळे त्यांना वाईट वाटणार नाही आणि मुलं या गोष्टी लवकर समजून घेतील. (Photo : Freepik)
पालकांनो, मुलं तुमच्याशी कधीही खोटं बोलणार नाहीत, फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
माइंडफुल पॅरेंटिंगचा वापर करून मुलांबरोबरचे नाते पालक घट्ट करू शकतात पण, माइंडफुल पॅरेंटिंग म्हणजे काय? आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.
Web Title: Do you know mindful parenting try these things children will never lie parents child relationship ndj