• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. new heart attack risk found can this b vitamin be a trigger side effects of vitamin b3 srk

‘व्हिटॅमिन बी ३’चे अतिसेवन ठरू शकते हृदयविकाराचे कारण; शरीरासाठी योग्य मात्रा किती?

मल्टीविटामिन गोळ्या किंवा सप्लिमेंट्स औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

February 29, 2024 12:37 IST
Follow Us
  • New Heart Attack Risk Found Can This B Vitamin
    1/9

    Side effects of vitamin B3: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, असंतुलित आहारामुळे आणि शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असल्यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता राहते. यामुळे अनेक जण स्वतःला ॲक्टिव ठेवण्यासाठी बरेच जण काहीही विचार न करता बाजारात उपलब्ध असलेल्या जीवनसत्त्वांच्या गोळ्या घेतात. (Photo: Freepik)

  • 2/9

    पण, तुम्हाला माहीत आहे का की, मल्टीविटामिन गोळ्या किंवा सप्लिमेंट्स औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. (Photo: Freepik)

  • 3/9

    आता नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, व्हिटॅमिन बी३ किंवा नियासिनच्या अतिरिक्त सेवनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होऊन रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवून हृदयरोगाचा धोका वाढवू शकते. (Photo: Freepik)

  • 4/9

    व्हिटॅमिन बी३ सप्लिमेंटच्या अतिरिक्त सेवनानं त्रास होऊ शकतो. त्यामुळे एक हजार मिलीग्रॅमचे व्हिटॅमिन बी ३ सप्लिमेंट्स घेत असाल तर ते आत्ताच थांबवलं पाहिजे.(Photo: Freepik)

  • 5/9

    आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना दररोज १६ मिलीग्राम व्हिटॅमिन बी३ आणि महिलांना १४ मिलीग्राम व्हिटॅमिन बी३ ची आवश्यकता असते, तर गर्भवती महिलांसाठी त्याचे प्रमाण १८ मिग्रॅ. असणं गरजेचं आहे.(Photo: Freepik)

  • 6/9

    पोटाच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी ३ खूप महत्त्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन बी ३ निकोटीनिक ॲसिड म्हणूनदेखील ओळखले जाते. मात्र, ते योग्य प्रमाणात नाही घेतले तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.(Photo: Freepik)

  • 7/9

    हृदयविकाराची समस्या कुटुंबांमध्ये अनुवंशिकरित्या असेल तर याचा धोका अधिक असतो. अशा लोकांनी आपले वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. धूम्रपान करू नये आणि नियमित शारीरिक हालचाली कराव्यात, असा सल्ला दिला जातो.(Photo: Freepik)

  • 8/9

    अभ्यासातून असे दिसून आले आहे की, नियासिनमुळे जळजळ होते. यामुळे धमन्या अरुंद होतात आणि प्लेक्सच्या वाढीला वेग येतो आणि ब्लॉकेजेस होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.(Photo: Freepik)

  • 9/9

    कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. जास्त कोलेस्ट्रॉलमुळे नसा ब्लॉक होतात, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून वेळीच काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांनी आहार आणि व्यायामावर भर देऊन ते नियमितपणे करावे.(Photo: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: New heart attack risk found can this b vitamin be a trigger side effects of vitamin b3 srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.