• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. upvas recipe for mahashivratri 2024 try this maharashtrian sweet potato dish follow the steps dha

Recipe : महाशिवरात्री उपवास रेसिपी; रताळ्याचा ‘हा’ खास पदार्थ बनवून पाहा

Mahashivratri upvas : उपवासासाठी खिचडी आणि फळे नेहमी खाल्ली जातात. त्याऐवजी रताळी वापरून हा गोड पदार्थ बनवून पाहा.

March 7, 2024 18:46 IST
Follow Us
  • Mahashivratri special sweet potato upvas recipe
    1/7

    Mahashivratri upvas recipe : महाशिवरात्रीनिमित्त अनेकांचे उपवास असतात. मात्र कोणताही उपवास असला कि अनेकांच्या घरी, साबुदाण्याची खिचडी, वरी तांदूळ, हा साधारण एक ठरलेला मेन्यू बनवला जातो. तुमचाही या दिवशी उपवास असेल तर, रताळ्याच्या गोड फोडी बनवून पाहा. हा सोपा पदार्थ कसा बनवायचा त्यांची रेसिपी युट्युबवरील vmiskhadyayatra103 नावाच्या चॅनलने शेअर केली आहे.[Photo credit – Freepik]

  • 2/7

    १/२ किलो रताळी, १ वाटी ओला नारळ, ४ चमचे तूप, १०-१२ लवंग, जिरे, मीठ, साखर, वेलची पूड [Photo credit – Freepik]

  • 3/7

    आता, गॅसवर एक कढई तापवत ठेवून त्यामध्ये ४ चमचे तूप घालून घ्यावे. तूप थोडेसे तापल्यानंतर त्यामध्ये १० ते १२ लवंगा घालून त्यांना परतून घ्या.[Photo credit – Freepik]

  • 4/7

    तुपामध्ये लवंगा फुलल्यानंतर, त्यामध्ये चमचाभर जिरं घालून लवंगीसह परतून घ्यावे. आता चिरलेल्या रताळ्याच्या फोडी या कढईमध्ये घालून ढवळून घ्या. रताळ्याच्या फोडी ढवळून झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या. आता काही मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवून, रताळी शिजू द्यावी.[Photo credit – Freepik]

  • 5/7

    दोन-तीन मिनिटांनी कढाईवरील झाकण काढून, रताळ्याच्या फोडी ढवळून घ्या. रताळी व्यवस्थित शिजण्यासाठी ही कृती साधारण ३ ते ४ वेळा करावी. आता कढईमधील फोडी शिजल्यानंतर, त्यामध्ये एक वाटी ओले खोबरे, आणि पाच ते सहा चमचे साखर घालून, सर्व गोष्टी नीट ढवळून घ्यावे.[Photo credit – Freepik]

  • 6/7

    घातलेली साखर विरघळेपर्यंत, कढईवर पुन्हा झाकण ठेवून द्यावे. रताळ्याच्या फोडी नीट शिजल्यानंतर, त्यांना सोनेरी रंग प्राप्त झाल्यानंतर, त्यामध्ये थोडी वेलची पूड घालून कढईखालील गॅस बंद करावा. [Photo credit – Freepik]

  • 7/7

    तयार आहेत आपल्या उपवास स्पेशल रतळाच्या गोड फोडी. हा पदार्थ गरमागरम असताना खाण्यासाठी घ्यावा.[Photo credit – Freepik]

TOPICS
फूडFoodमहाशिवरात्री २०२५Maha Shivratri 2025रेसिपीRecipeहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Upvas recipe for mahashivratri 2024 try this maharashtrian sweet potato dish follow the steps dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.