• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. international womens day 2024 menstrual hygiene tips every woman must follow srk

Women’s Day 2024: मी मासिक पाळीदरम्यान स्वत:ची काळजी घेणार; प्रत्येक महिलेनं स्वतःला वचन द्यायलाच हवं!

Women’s Day 2024: वाढत्या वयाबरोबर स्त्रीयांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर मग आज जाणू घेऊयात, स्त्रीयांनी त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी.

March 8, 2024 17:03 IST
Follow Us
  • International Womens Day 2024 Menstrual Hygiene Tips
    1/9

    Women’s Day 2024 : दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च साजरा केला जातो.आजच्या महिलांची जीवनशैली खूप बदलली आहे. आंतरराष्‍ट्रीय महिला दिन जवळ आला असताना महिलांनी योग्‍य पोषणासह त्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी का घेतली पाहिजे आणि सक्रिय जीवनशैली का राखली पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (Photo: Freepik)

  • 2/9

    स्त्री गृहिणी असो किंवा नोकरी करणारी तिचे संपूर्ण आयुष्य ऑफिस, घर आणि मुले सांभाळण्यात अडकलेले असते. पण या सर्वात ती स्वत:ला इतकी गुरफटून घेते की तिच्या तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. (Photo: Freepik)

  • 3/9

    दरम्यान प्रत्येक महिलेनं स्वच्छतेबाबत जागरुक राहणं गरजेचं आहे. तसेच, या दिशेनं महिलांचं सक्षमीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आजही भारतात अशी अनेक गावं आहेत, जिथे महिलांना सॅनिटरी पॅड मिळत नाहीत. (Photo: Freepik)

  • 4/9

    मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पन्स नियमितपणे बदलले पाहिजेत. पॅड किंवा टॅम्पन्स दर ४ ते ६ तासांनी बदलले पाहिजेत. (Photo: Freepik)

  • 5/9

    याऊलट जर तु्म्ही तेच पॅड तासनतास बदलले नाही तर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात आणि संसर्गाचा धोका वाढतो. जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमच्या हँडबॅगमध्ये एक्स्ट्रा सॅनिटरी पॅड ठेवा.(Photo: Freepik)

  • 6/9

    सॅनिटरी पॅड फेकून देताना ते टॉयलेट पेपर किंवा रॅपरमध्ये गुंडाळा आणि वेगळ्या डस्टबिनमध्ये ठेवा. बाथरूममध्ये सॅनिटरी पॅड कधीही फ्लश करू नका. कारण ते पाईपमध्ये अडकू शकते. त्यामुळे पर्यावरणात प्रदूषण वाढू शकते.(Photo: Freepik)

  • 7/9

    मासिक पाळी दरम्यान स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या टॉयलेटची जागा कोमट पाणी आणि साबणाने कमीतकमी दोनदा स्वच्छ करा.(Photo: Freepik)

  • 8/9

    मासिक पाळी दरम्यान भरपूर पाणी प्यावे. हे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवेल. या सर्व व्यतिरिक्त भरपूर फळे आणि भाज्या खा. (Photo: Freepik)

  • 9/9

    मासिक पाळी दरम्यान योग्य आहाराचे पालन केले पाहिजे. कॅफिन आणि खारट पदार्थ खाणे टाळा. कारण मासिक पाळीत असे खाल्ल्याने सूज आणि अस्वस्थता वाढू शकते.(Photo: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: International womens day 2024 menstrual hygiene tips every woman must follow srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.