-
रोज भाजी मार्केटमध्ये जाऊन फ्रेश भाजी आणणं बऱ्याच जणींना जमत नाही. किंवा आपल्या वेळेला भाजीवाला येईलच असंही नाही. त्यामुळे सहसा ४ ते ५ दिवस पुरेल एवढी भाजी आपण एकदम घेऊन ठेवतो. (Photo: Freepik)
-
पण ही भाजी काहीवेळेस फ्रिजमध्ये ठेवताना नीट काळजी न घेतल्यामुळे भाज्या खराब होतात तर काही जणांकडे फ्रिज नसल्यामुळे या भाज्या खराब होतात. (Photo: Freepik)
-
अशावेळी भाज्या खराब होऊ नयेत, त्या अधिक काळ फ्रेश आणि टवटवीत रहाव्यात यासाठी या काही पद्धती करून बघा. (Photo: Freepik)
-
भाजीपाला वेगवेगळ्या प्रकारे साठवावा लागतो. काही भाज्या खोलीच्या तपमानावर ताज्या ठेवता येतात तर काही फ्रिजमध्ये ठेवून ताज्या राहतात. अशा परिस्थितीत कोणती भाजी कशी साठवून दीर्घकाळ ताजी ठेवता येईल ते जाणून घेऊया. (Photo: Freepik)
-
पालक आणि कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या साठवण्यासाठी या भाज्या थेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. या भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी नीट धुवून कोरड्या कराव्यात. यानंतर या भाज्या पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि सीलबंद पॅकमध्ये ठेवा.(Photo: Freepik)
-
बटाटे आणि कांदे यांसारख्या भाज्या १ ते २ आठवडे सहज साठवता येतात. बटाटे आणि कांदे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. लसूण, बटाटे आणि कांदे यांसारख्या भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी त्यांना थंड ठिकाणी ठेवा.(Photo: Freepik)
-
काकडी आणि टोमॅटो पाण्यात टाका आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. अशा प्रकारे साठवून ठेवल्यास या भाज्या दीर्घकाळ ताज्या राहतील. (Photo: Freepik)
-
गाजर धुऊन वाळल्यानंतरच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. काकडी, सिमला मिरची, वांगी, यांसारख्या भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी ओल्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवाव्यात.(Photo: Freepik)
-
आजकाल बाजाराच भाज्या ठेवण्यासाठी खास पाऊच मिळते. या पाऊचला वरून एक झिप असते. ही झीप लावली की ते पाऊच एकदम एअर टाईट होते. त्यामुळे मग त्यात भाज्या अधिक काळासाठी चांगल्या टिकून राहतात.(Photo: Freepik)
फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्याच्या या ४ पद्धती; भाज्या राहतील अधिककाळ फ्रेश आणि टवटवीत
Kitchen Tips: भाजी काहीवेळेस फ्रिजमध्ये ठेवताना नीट काळजी न घेतल्यामुळे भाज्या खराब होतात तर काही जणांकडे फ्रिज नसल्यामुळे या भाज्या खराब होतात. अशावेळी भाज्या खराब होऊ नयेत, त्या अधिक काळ फ्रेश आणि टवटवीत रहाव्यात यासाठी या काही पद्धती करून बघा..
Web Title: How store vegetables fresh and green for long in fridge how to keep vegetables fresh in marathi srk