-
तुमच्यापैकी अनेक जण घराबाहेर पडताना चेहऱ्यापासून त्वचेवर सनस्क्रीनचा वापर करीत असतील.
-
सोशल मीडियावरही हल्ली अनेक जण समुद्रकिनारी सुट्या एन्जॉय करताना त्वचेच्या संरक्षणासाठी कोणत्या प्रकारची सनस्क्रीन वापरली पाहिजे, सनबाथ घेताना त्वचेची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे, यासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.
-
पण, उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या प्रकारची सनस्क्रीन वापरणे फायदेशीर असते याविषयी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. तृप्ती डी. अग्रवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
-
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, एसपीएफ ५० पेक्षा अधिक एसपीएफ असलेली सनस्क्रीन वापरल्यास विस्तीर्ण सूर्यकिरणांच्या संपर्कात असतानाही त्वचेचे संरक्षण होईल, तसेच तुम्हाला वारंवार त्वचेवर सनस्क्रीन लावण्याची गरज भासणार नाही.
-
कडक उन्हात त्वचा खूप टॅन होते. या टॅनिंगमुळेच त्वचेचे अधिक नुकसान होऊ शकते.सामान्यत: त्वचेचे सहा प्रकार असतात आणि त्यातील काही प्रकारची त्वचा सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यावर जळते आणि काहींची टॅन होते.
-
त्यात स्कीन प्रोटेक्टिव्ह ऑइल, सीरम, क्रीम व लोशन लावून दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्यामुळेही त्वचेचे नुकसान होऊ शकते. तुमच्या त्वचेचा रंग आणि टेक्श्चर कसेही असले तरी ही बाब त्वचेसाठी हानिकारक असते.
-
काही लोक बेस टॅनसाठी सनबाथिंगचा पर्याय निवडतात. तर काही इनडोअर टॅनिंगची निवड करतात. परंतु, दोन्ही प्रकारांत हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (UV) विकिरण सोडले जातात; जे तुमच्या त्वचेवर परिणाम करतात. मग ते अल्ट्राव्हायोलेट A (UVA) विकिरण असो, जे काचेतून जाऊ शकते किंवा अल्ट्राव्हायोलेट B (UVB) विकिरण.
-
कोणत्याही प्रकारच्या अतिनील विकिरणांच्या संपर्कात आल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. तर सांगायचे असे की, सनस्क्रीनचे एक्स्पोजर त्वचेतील मेलॅनिन घटकाला सक्रिय करते; ज्यामुळे तुमच्या त्वचेचे धोकादायक किरणांपासून संरक्षण होते, त्वचेला गडद रंग देते आणि एक आर्मर्ड लेयर बनवते.
-
पण, नुसते मेलॅनिन आपल्या त्वचेचे सूर्यप्रकाशापासून पुरेसे संरक्षण करू शकत नाही. त्यात अतिनील किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो किंवा त्वचेसंबंधित इतरही अनेक आजार होऊ शकतात.
-
दुसरे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बेस टॅन अतिनील किरणोत्सर्गापासून कोणतेही संरक्षण करत नाही. कारण- बेस टॅनमध्ये ५ पेक्षा कमी सन प्रोटेक्शन फॅक्टर (SPF) असतो. त्यामुळे तुम्हाला सनबर्न आणि त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी SPF ३५ ते ५० मधील कोणत्याही सनस्क्रीनची गरज भासते.
-
म्हणूनच त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, तुम्ही घराबाहेर जाताना SPF 50 चे सनस्क्रीन वापरा आणि तुम्ही दीर्घकाळ तीव्र सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असाल, दर तासाने त्वचेवर पुन्हा सनस्क्रीनचा वापर करा. तुम्ही SPF 60 सनस्क्रीन वापरलात तरी चालेल.
-
चार दिवस रोज १० मिनिटे तुम्ही सूर्यप्रकाशात असाल, तर यामुळे तुमची त्वचा टॅन तर होईलच; पण तुमच्या त्वचेचे नुकसानही होऊ शकते. म्हणूनच सूर्यप्रकाशापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी घराबाहेर पडताना शरीर जास्तीत जास्त झाकून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच संपूर्ण हात, पाय झाकतील असले कपडे वापरा.
-
आणखीन एक गोष्ट जर उन्हात समुद्रकिनाऱ्यावर पोहणार असाल, तर तुम्ही वॉटरप्रूफ सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. जर तुमच्या त्वचेवर कोणतीही वेगळी लक्षणे दिसत असतील किंवा ती खराब होत असल्याचे जाणवत असेल, तर अशा वेळी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्वचेवर कोणत्याही प्रकारचे लोशन, टोनर आणि इतर क्रीम किंवा घरगुती उपाय करणे टाळा.
-
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही टॅन, बेस टॅन किंवा इतर गोष्टी तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित नसतात. अनेक दशकांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांच्या थेट संपर्कात आल्याने होणाऱ्या टॅनिंगमुळे मेलेनोमा आणि नॉन-मेलेनोमा त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. (सर्व फोटो सौजन्य : Freepik)
तुम्ही घराबाहेर पडण्याआधी त्वचेवर ‘SPF 50’ सनस्क्रीनचा वापर करताय? मग वाचा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला
Sunscreen benefits for skin : उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन वापरावे, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Web Title: Diy skincare benefits of using sunscreen which is better sunscreen spf 30 or spf 50 why a sunscreen over spf 50 is still the best bet for the beach sjr