-
रमजानचा महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात लोक उपवास ठेवतात आणि संध्याकाळी खजूर खाऊन उपवास सोडतात. खजूर हे केवळ परंपरेनुसार महत्त्वाचे नसून ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. (Photo: Freepik)
-
खजूर खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि पचनक्रियाही चांगली राहते. त्यामुळे रमजानमध्ये खजूर खाणे उत्तम मानले जाते. (Photo: Freepik)
-
रमजाननिमित्त खजुराचे वेगवेगळे प्रकार बाजारात दाखल झाले असले तरी महागाईमुळे खजुरासह इतर सुक्यामेव्याचे देखील भाव काही प्रमाणात वाढले आहेत. (Photo: Freepik)
-
बाजारातील विविध प्रकारच्या खजूरांमधून योग्य प्रकारचे खजूर निवडणे कठीण असते. परंतु, एका सोप्या पद्धतीने तुम्ही बनावट आणि चांगल्या दर्जाचे खजूर सहज ओळखू शकता. (Photo: Freepik)
-
या छोट्याशा टीपने तुम्ही चांगले आणि पौष्टीक खजूर खरेदी करू शकता.आरोग्यासाठी चांगल्या दर्जाच्या खजूर निवडण्यासाठी त्याचा रंग काळजीपूर्वक पाहा. (Photo: Freepik)
-
सर्वोत्तम खजूर हा सहसा मऊ आणि गुळगुळीत असतो, त्याचा रंग एकसमान असतो आणि खूप कोरड्या किंवा जास्त चिकट नसतात. (Photo: Freepik)
-
बाजारात अनेक वेळा खजुरांना अधिक आकर्षक बनवण्यासाठी साखरेचा थर लावला जातो. म्हणूनच ओरिजनल खजूर ओळखण्यासाठी, त्यांना हलके दाबण्याचा प्रयत्न करा. (Photo: Freepik)
-
चांगल्या दर्जाचे खजूर मऊ असतात. रंग – निवडलेल्या खजूरांचा रंग एकसमान असावा. (Photo: Freepik)
-
सुगंध – नैसर्गिक गोडवा असतो आणि त्यांचा सुगंध ताजेपणा दर्शवतो.पॅकेजिंग – स्वच्छ आणि सीलबंद पॅकेजिंगमध्ये असलेले खजूर निवडा जेणेकरून तुम्ही ते दीर्घकाळ ठेवू शकता. (Photo: Freepik)
कसा ओळखायचा ओरिजनल खजूर? ‘या’ स्मार्ट टिप्स जाणून घ्या
एका सोप्या पद्धतीने तुम्ही बनावट आणि चांगल्या दर्जाचे खजूर सहज ओळखू शकता. या छोट्याशा टीपने तुम्ही चांगले आणि पौष्टीक खजूर खरेदी करू शकता.
Web Title: Find the best dates easily a quick guide to spotting the real deal srk