-
Reusing of used cooking oil: आजकाल सर्व घरात स्वयंपाकासाठी तेलाचा वापर वेगाने वाढत आहे. बऱ्याच घरांत पुरी, भजी किंवा एखादे तळण केल्यानंतर उरलेले तेल परत वापरले जाते, तेलाचा हा पुनर्वापर सामान्य आहे. (फोटो: Freepik)
-
जवळजवळ प्रत्येक घरातील लोक उरलेले स्वयंपाकाचे तेल वापरतात. काही तळण्यासाठी वापरलेले तेल नंतर लोक भाजी, पराठे किंवा इतर कोणत्याही पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. (फोटो: Freepik)
-
पण दुसरा पदार्थ तयार करण्यासाठी एकदा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करणे हे खूप हानिकारक ठरू शकते. खरंतर एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरण्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होते. (फोटो: Freepik)
-
बरेच लोक स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा रिफाइंड तेल वापरतात परंतु ते वापरण्याची योग्य पद्धत माहित नसते.(फोटो: Freepik)
-
स्वयंपाक तेल वापरण्यासाठी विविध पद्धती आहेत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की, स्वयंपाकाचे तेल जास्त वेळ शिजवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.(फोटो: Freepik)
-
उरलेल्या तेलाचा वारंवार पुनर्वापर केल्यास पोटाच्या समस्या वाढू शकतात. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने, तुम्हाला अल्सर, ॲसिडिटी, जळजळ असे अनेक त्रास होऊ शकतात.(फोटो: Freepik)
-
तळणानंतर उरलेले तेल पुन्हा वापरल्याने लठ्ठपणाही होऊ शकतो. एवढेच नाही तर उरलेल्या तेलापासून बनवलेले अन्न सेवन केले तर मधुमेहाचाही त्रास होऊ शकतो. (फोटो: Freepik)
-
तेलामध्ये फॅट असते हे फार कमी लोकांना माहीत आहे. जर तुम्ही तेल वारंवार गरम करून ते वापरत असाल तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तेच तेल पुन्हा पुन्हा वापरणे योग्य नाही.(फोटो: Freepik)
-
अनेकांना तेल पुन्हा पुन्हा गरम करून ते वापरण्याची सवय असते. त्याच पॅनमध्ये पुन्हा पुन्हा तळू नका. (फोटो: Freepik)
जर तुम्ही उरलेले तेल पुन्हा जेवणात वापरत असाल तर सावधान! आरोग्यासाठी ठरू शकते घातक
Used Cooking Oil Side Effects: खरंतर एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरण्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होते. बरेच लोक स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा रिफाइंड तेल वापरतात परंतु ते वापरण्याची योग्य पद्धत माहित नसते.
Web Title: Heres why you should never reheat cooking oil heating cooking oil too much bad for your health srk