-
What Is Overhydration आपले शरीर हे ६०% पाण्याने बनले आहे, म्हणजेच पाणी प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटकांपैकी एक आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.(फोटो : Freepik)
-
आरोग्य निरोगी ठेवायचे असेल, डिहायड्रेशनच्या समस्येतून सुटका हवी असल्यास नियमित जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. कारण योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त विषारी घटक सहजासहजी बाहेर फेकले जातात.(फोटो : Freepik)
-
पण तुम्हाला हे माहीत आहे का की जास्त प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकते.वैद्यकीय सल्लागार डॉक्टर आशुतोष शुक्ला यांच्या मते, जास्त पाणी पिल्याने प्रत्येकालाच त्रास होईल असं नाही. पण आपण त्याचे प्रमाण ठरवले पाहिजे. (फोटो : Freepik)
-
जास्त पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो आणि ते आरोग्यासाठी कसे नुकसानकारक ठरते जाणून घ्या. (फोटो : Freepik)
-
ज्यांना किडनीच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी ओव्हरहायड्रेशन ही एक समस्या बनू शकते. परिणामी, हायपोनेट्रेमियामध्ये रक्तातील सोडीयमचे प्रमाण कमी होते. (फोटो : Freepik)
-
जास्त पाणी प्यायल्याने सतत लघवीला लागते. यामुळे किडनीवर ताण पडतो. हे किडनीच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.(फोटो : Freepik)
-
डॉक्टर आशुतोष यांच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज सरासरी ८ ते १२ ग्लास पाण्याची आवश्यकता असते. तुमच्या शरीराच्या प्रत्येक २० किलो वजनासाठी तुम्हाला १ लिटर पाणी आवश्यक आहे. (फोटो : Freepik)
-
म्हणूनच, जर तुमचे वजन ६० किलो असेल, तर तुम्हाला दररोज ३ लिटर पाण्याची आवश्यक आहे.खासकरुन पुरुषांनी दिवसाला सुमारे ३.७ लिटर पाणी प्यावं तर महिलांनी २.७ लीटर) प्यावे.(फोटो : Freepik)
-
डॉ. आशुतोष यांनी असेही निदर्शनास आणून दिले की एखाद्या व्यक्तीला व्यायाम, वातावरण, एकूण आरोग्य, गर्भधारणा आणि स्तनपान अशा अनेक घटकांच्या आधारे त्यांच्या एकूण पाण्याच्या सेवनात बदल करण्याची आवश्यकता असू शकते. (फोटो : Freepik)
गरजेपेक्षा अधिक पाणी पिणे ठरेल धोकादायक! वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
जास्त पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो आणि ते आरोग्यासाठी कसे नुकसानकारक ठरते जाणून घ्या
Web Title: Overhydration this is what happens if you drink too much water what is overhydration srk