-
सध्याच्या काळात बहुतेक लोकांचं काम हे डेस्कवर बसून असतं. मग, ऑफिसमध्ये सतत एकाच जागी बसून लोक काम करताना दिसतात. त्यात आजकालचे लोक फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात.(फोटो : Freepik)
-
एकाच जागी बसून काम करणं, फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाणं अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. लोकांच्या शरीरातील चरबी वाढते, पोट सुटायला लागतं.(फोटो : Freepik)
-
लोकं वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. मग जिमला जाणं, डाएट करणं अशा अनेक गोष्टी करत असतात. पण, त्यांना दररोजच्या कामामुळे या गोष्टी करायला वेळ मिळत नाही. (फोटो : Freepik)
-
मात्र, फिट राहण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही योगासने करू शकता. योग शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. चालण्याच्या व्यायामापेक्षा योगामुळे जास्त कॅलरी बर्न करण्यास मदत होते. (फोटो : Freepik)
-
त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर योगा खूप उपयुक्त ठरू शकतो. जाणून घ्या त्या योगासनांबद्दल.(फोटो : Freepik)
-
दररोज योग्य प्रमाणात योगा केल्यानं व्यायामाच्या तुलनेत योगामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात. आणखी एका अभ्यासात असे दिसून आले की, योगामुळे पोटाभोवती जमा झालेली कठीण चरबीही लवकर वितळण्यास मदत होते.(फोटो : Freepik)
-
सूर्यनमस्कार तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. सूर्य नमस्कार हा योगाचा सराव सुरू करण्याचा उत्तम मार्ग आहे. (फोटो : Freepik)
-
फलकसन शरीरातील कॅलरी बर्न करण्यासाठी सर्वात प्रभावी योगासनांपैकी एक म्हणजे प्लँक पोझ किंवा फलकसन.(फोटो : Freepik)
-
उत्कटासन पायाच्या स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन उपयुक्त आहे. या आसनाला कुर्सी आसन असेही म्हणतात.(फोटो : Freepik)
पोट, कंबरेच्या टायर्समुळे फिगर बेढब झाली? ‘हे’ योगासनं करा; चरबी भराभर होईल कमी
चालण्याच्या व्यायामापेक्षा योगामुळे जास्त कॅलरी बर्न करण्यास मदत होते. अशी काही योगासने आहेत, जी स्नायूंना ताणण्यासदेखील मदत करतात. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर योगा खूप उपयुक्त ठरू शकतो. जाणून घ्या त्या योगासनांबद्दल.
Web Title: Yoga for weight loss which yoga asanas can help you burn calories faster srk