-
बहुधा लोक तळलेल्या पदार्थांतील तेल शोषण्यासाठी वर्तमानपत्र, टिश्यू पेपरचा वापर करतात. पण, हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. (फोटो : Freepik)
-
जर तुम्ही तळलेल्या पदार्थांतील जास्तीचे तेल काढण्यासाठी टिश्यू पेपर वापरत असाल, तर ते आताच थांबवा. (फोटो : Freepik)
-
“जेव्हा आपण एखादा पदार्थ तळल्यानंतर तो टिश्यू पेपरवर ठेवतो, तेव्हा त्याला पाणी सुटतं आणि तो पदार्थ ओला होतो. त्यामुळे पदार्थाचा कुरकुरीतपणा जातो आणि पदार्थ नरम पडतो. (फोटो : Freepik)
-
त्यामुळे पदार्थाची चवही बदलू शकते. तसेही डीप फ्राइड फूड आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. वरून ते ठेवण्यासाठी टिश्यू पेपर वापरल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.(फोटो : Freepik)
-
कित्येकदा आपण तेलकट पदार्थ टिश्यूवर ठेवतो. मात्र, यातील रासायनिक घटक पदार्थात जाऊन ते आपल्या पोटात जातात. (फोटो : Freepik)
-
टिश्यू पेपरमध्ये असलेल्या आम्ल पदार्थामुळे आग लागण्याचा धोका अधिक वाढतो. गरमागरम एखादा पदार्थ आपण जर टिश्यू पेपरवर ठेवला, तर टिश्यू पेपर पेट घेण्याची शक्यता असते.(फोटो : Freepik)
-
कोणताही पदार्थ हा नेहमी योग्य स्मोकिंग पॉईंटपर्यंतच तळावा; जेणेकरून पदार्थात जास्त तेल शोषले जाणार नाही. पॅन किंवा कढईत कोणताही पदार्थ तळताना छिद्र असलेलाच चमचा वापरा. (फोटो : Freepik)
-
तळलेले पदार्थ साठवायचे असल्यास हवाबंद कंटेनर हा एक सुरक्षित पर्याय आहे. तळलेले पदार्थ ओलसर होऊ नयेत म्हणून ते एकमेकांच्या वर ठेवू नका.(फोटो : Freepik)
-
कागदी पिशवी ही योग्य निवड आहे. त्या कमी खर्चीक आणि सहज उपलब्ध होणाऱ्या असतात. तसेच कागदी पिशव्या जास्त टिकाऊ असतात. (फोटो : Freepik)
तुम्हीही तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवर ठेवता का? थांबा…आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
तुम्हीही तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवर ठेवता का?
Web Title: If you use tissue paper to soak excess oil from fried foods you are apparently doing it all wrong srk