-
झपाट्याने बदलणाऱ्या या जीवनशैलीत आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली येत असतो. (Photo: Freepik)
-
आपण ज्या पद्धतीने जीवन जगतो त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. कामाचा ताण, कौटुंबिक समस्या किंवा जबाबदाऱ्यांमुळे माणूस तणावग्रस्त होतो.(Photo: Freepik)
-
यावर अनेक उपाय डॉक्टर सुचवतात, मात्र तणाव दूर करण्यासाठी मिठीची, स्पर्शाची आणि मसाजची काय भूमिका आहे, या संदर्भात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शौनक अजिंक्य यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.(Photo: Freepik)
-
जे शब्दातून व्यक्त करता येत नाही ते मिठीत व्यक्त करता येतं. आपल्या भावना काहीही न बोलता व्यक्त करण्याचे मिठी हे प्रभावी माध्यम आहे. (Photo: Freepik)
-
जर तुम्ही खूप तणावात असाल, तुम्हाला तो तणाव असह्य झाला असेल तेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीने मिठी मारली की तुम्हाला मानसिक आधार मिळून बरं वाटायला लागतं.(Photo: Freepik)
-
तणाव असल्याने तुमचा रक्तदाब आणि हृदयाची गती कमी होऊ शकते. पण, मिठी मारल्याने कॉर्टिसोल, तणावाची पातळी कमी होते. (Photo: Freepik)
-
विशेष म्हणजे डोक्याला स्पर्श करणे हे मानसिक आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर असल्याचे आढळून आले.(Photo: Freepik)
-
टच थेरपी म्हणजे शारीरिक स्पर्शाची एक भावना. ही थेरपी एक उपचार पद्धती आहे. ही थेरपी शरीराच्या व्हॅगस मज्जातंतूला सक्रिय करते. डोक्यावर हात फिरवून आशीर्वाद देण्यापासून ते मालिश या गोष्टी स्पर्श चिकित्सेचा भाग आहेत. (Photo: Freepik)
-
ही थेरपी किशोरवयीन मुलांसाठी आत्मविश्वासाचं साधन आहे. किशोरावस्थेच्या गोंधळाच्या काळात मुलांना मायेचा स्पर्श सुरक्षिततेची भावना देतो. (Photo: Freepik)
मिठी मारल्याने खरंच तणाव कमी होतो? काय आहे ‘टच थेरपी’? जाणून घ्या फायदे
जादू की झप्पी गरजेची; मिठी मारल्याने खरंच तणाव कमी होतो?
Web Title: Can hugs a massage and holding hands relieve you of stress srk