-
बऱ्याच लोकांना दररोज कॉफी प्यायला आवडते आणि यामुळे कधीकधी एकापेक्षा जास्त वेळा कॉफीचे सेवन केले जाते.
-
जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने आपल्या शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते आणि याचे परिणाम विशेषतः आपल्या केसांवर होतात.
-
कॉफीचे अधिक सेवन केल्याने आपल्या शरीरातील ‘ॲड्रेनल्स’ कमकुवत होतात आणि यामुळे आपले केस गळतात.
-
कॅफिनच्या अतिसेवनामुळे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे आपल्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
-
शरीरात कॅफिनच्या उच्च पातळीमुळे ‘कॉर्टिसॉल’चे प्रमाण वाढते, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवरदेखील होऊ शकतो.
-
कॅफिनमुळे आपल्या शरीरात लोह आणि मॅग्नेशियमसारख्या आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते. हे आवश्यक पोषक तत्व आपल्या शरीरात केसांच्या वाढीसह त्वचेचे रक्षणदेखील करते.
-
केसांच्या समस्या टाळण्यासाठी कॅफिनच्या सेवनाचे प्रमाण हे नियंत्रित केले पाहिजे.
-
तज्ज्ञांनुसार साधारणपणे कॉफीचे सेवन हे दररोज फक्त ४०० मिलीग्राम असले पाहिजे.
-
(Photos: Unsplash)
Photos: सतत कॉफी प्यायल्याने होऊ शकते केस गळती? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
बऱ्याच लोकांना दररोज कॉफी प्यायला आवडते आणि यामुळे कधीकधी एकापेक्षा जास्त वेळा कॉफीचे सेवन केले जाते. जाणून घेऊया कॉफीच्या अधिक सेवनामुळे केसांवर काय परिणाम होतात.
Web Title: Photos drinking coffee continuously can cause hair loss read experts advice arg 02