-
ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रहांमुळे आणि त्याचा ठराविक वेळेनंतर बदलणाऱ्या स्थितीमुळे जाचकाच्या आयुष्यावर परिणाम होतो.
-
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह हा धन, विलास, भौतिक सुख, प्रेम यांचा कारक मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार एप्रिलच्या शेवटी म्हणजेच २८ एप्रिल रोजी सकाळी ०७.२७ वाजता शुक्र मेष राशीत अस्त स्थितीत येणार आहे.
-
शुक्राच्या अस्तानंतर काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
शुक्रदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. काही नवीन स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होऊ शकतो.
-
शुक्रदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचं नवीन स्रोत उघडू शकतात. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
-
कन्या राशीच्या लोकांना शुक्रदेवाच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. जीवनातील अडथळे दूर होऊन प्रगतीकडे वाटचाल सुरू होऊ शकते. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
उद्यापासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? शुक्रदेव अस्त होताच होऊ शकतो मोठा धनलाभ
Shukra Ast 2024: शुक्राच्या अस्तानंतर काही राशींना आर्थिक बाबतीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात…
Web Title: Shukra ast in mesh april 2024 these zodiac sing can get huge money pdb