-
इडली हा जरी दक्षिण भारतीय पदार्थ असला तरी अनेकांना आवडतो. हा एक लोकप्रिय आणि तितकाच आरोग्यादायी असा नाश्ता आहे. (Photo : Pexel)
-
सकाळचा नाश्त्यात मऊ लुसलुशीत इडली खाल्ल्या की दिवसभ ऊर्जा मिळते. अनेक जण इडली फूलून येत नाही म्हणून घरी बनविणे टाळतात आणि बाहेर इडली खातात. पण तुम्ही काही टिप्स वापरून घरच्या घरी टम्म फुगलेली इडली बनवू शकता. त्यासाठी खालील टिप्स लक्षात ठेवा. (Photo : Pexel)
-
इडली बनवताना सर्वात महत्त्वाचे साहित्य म्हणजे तांदूळ आणि डाळ. इडली हे भिजवलेल्या तांदूळ आणि डाळीचे मिश्रण आहे. हे इडली पात्रात नंतर वाफवून इडली बनवली जाते. फुगलेल्या इडलीसाठी इडली तांदूळ किंवा आधी उकळलेले तांदूळ वापरा ज्याला उकड तांदूळ सुद्धा म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इडली बनवताना डाळ आणि तांदळाचे प्रमाण योग्य घ्या. दोन वाट्या तांदळासाठी एक वाटी डाळ घ्या. (Photo : Pexel)
-
सुरुवातीला इडली बनवताना काळ्या रंगाची हरभरा डाळ किंवा उडीद डाळ वापरली जायची पण आता पांढरी उडीद डाळ वापरली जाते. पॉलिश न केलेली डाळ इडलीसाठी वापरली जाते. (Photo : Pexel)
-
इडली फुगवण्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता. भिजवलेले मेथीचे दाणे इडली फुगवण्यास मदत करतात. याशिवाय हे मेथीचे दाणे आरोग्यदायी आहे आणि पीठ आंबवण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. पण याचा वापर मर्यादेत करावा. जास्त प्रमाणात मेथीचे दाणे वापरल्यास इडली चवीला कड होते आणि तुम्हाला खरंच पांढरी इडली हवी असेल तर मेथीच्या बिया अजिबात टाकू नका. (Photo : Social Media)
-
इडली बनवताना टेबल मीठ वापरू नका. टेबल मीठ म्हणजे आयोडीनयुक्त मीठ होय. याशिवाय रॉक मीठ म्हणजेच सैंधव मीठ वापरा. (Photo : Social Media)
-
इडली फुगवण्यासाठी काही लोक इडलीच्या मिश्रणामध्ये पोहे किंवा साबुदाणा सुद्धा घालतात जे आंबायला मदत करतात. (Photo : Social Media)
-
जर तुम्हाला तुमची इडली फुगवायची असेल तर मिश्रणामध्ये पाणी टाकताना प्रमाणाकडे लक्ष द्या. पीठ थोडे पातळ होऊ द्या. (Photo : Social Media)
-
इडली पात्रात इडलीचे मिश्रण टाकण्यापूर्वी इडली प्लेट्स ला तेल लावा. यामुळे वाफवलेल्या इडल्या चांगल्या फुगतात आणि लगेच बाहेर येतात.वाफवलेल्या इडल्या इडली पात्रातून काढण्यासाठी धारदार चमचा वापरा. (Photo : Social Media)
Idli Recipe : टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची?
अनेक जण इडली फूलून येत नाही म्हणून घरी बनविणे टाळतात आणि बाहेर इडली खातात. पण तुम्ही काही टिप्स वापरून घरच्या घरी टम्म फुगलेली इडली बनवू शकता. त्यासाठी खालील टिप्स लक्षात ठेवा.
Web Title: Soft fluffy and puffy idli recipe how to make perfect idali recipe ndj