• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. rich source of protein and calcium milk spike your blood sugar levels or not read what expert says asp

मधुमेही रुग्णांसाठी ‘दूध’ योग्य पेय आहे का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

एक कप दुधाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते का हे जाणून घेऊ…

April 29, 2024 21:34 IST
Follow Us
  • rich source of protein and calcium milk spike your blood sugar levels or not read what expert says
    1/9

    दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि म्हणूनच दुधाला सुपर फूडदेखील म्हटले जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    पण, दूध जास्त प्रमाणात प्यायल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यादेखील उदभवू शकतात. त्यामुळे दुधाचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध घट्ट असते. त्यात १०० टक्के जास्त फॅट्स आणि गाईच्या दुधापेक्षा जवळपास ४० टक्के जास्त कॅलरीज असतात. एकंदरीत म्हशीच्या दुधात फॅट्सचे प्रमाण जास्त असते; जे हृदयासाठी वाईट मानले जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    ज्या दुधातून फॅट्स काढून टाकले जातात, त्या दुधात कॅलरीज कमी असतात; तर स्किम्ड दुधात शून्य फॅट असते आणि २४० मिलिलिटरमध्ये फक्त ८० कॅलरीज असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    दुधाचे गुणधर्म पाहता, ते मधुमेही रुग्णांसाठी योग्य पेय आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. तर, द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मॅक्स हेल्थकेअरचे अध्यक्ष, प्रमुख एण्डोक्रायनोलॉजी व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अंबरीश मिथल यांनी एक कप दुधाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते की नाही हे स्पष्ट केले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    दुग्धजन्य पदार्थ, दही आणि दुधामुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका ११ ते १७ टक्क्यांनी कमी होतो. कारण -दुग्धजन्य पदार्थांमध्ये उच्च प्रथिने असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    ‘व्हे प्रथिनांचा’ (दुधापासून चीज बनविताना जो द्रवरूप पदार्थ मागे राहतो, त्याचे पावडर फॉर्ममध्ये रूपांतर म्हणजे व्हे प्रथिने) ग्लुकोज चयापचय आणि शरीराच्या वजनावर फायदेशीर प्रभाव पडतो. दह्यासारख्या प्रो-बायोटिक्सचाही चयापचय आरोग्यावर अनुकूल प्रभाव पडतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    त्याशिवाय दुधामध्ये बायोॲक्टिव्ह पेप्टाइड्स (peptides) आणि फॅटी ॲसिड यांसारखे घटक असतात; जे रक्तदाब कमी करण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    भारतीयांमध्ये चरबीयुक्त (Fat) दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका कमी झाल्याचे दिसून आले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Rich source of protein and calcium milk spike your blood sugar levels or not read what expert says asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.