-
जसे उन्हाळ्यात उष्णता वाढते तसे अनेकांना प्रश्न पडतो की त्यांच्या आहारात अंडी समाविष्ट करणे योग्य आहे की नाही कारण उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरात अधिक उष्णता निर्माण होते असा एक समज आहे.
-
जाणून घेऊया याबद्दल तज्ञां काय सांगतात.
-
बऱ्याच लोकांना अंडी खायला आवडतात आणि हे आरोग्यासाठी ही एक पौष्टिक आहार आहे. हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह अनेक इतर आवश्यक तत्वांनी भरलेले आहे. पण, अनेकांचा असा समज आहे की अंडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता अधिक वाढते आणि यामुळे पोटाच्या समस्या ही होऊ शकतात.
-
तज्ञांच्या मते उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढत नाही मात्र, उन्हाळ्यात आहारातील एक मात्र चूक म्हणजे पुरेसे पाणी न पिणे.
-
उन्हाळ्याच्या महिन्यांत तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश केला पाहिजे.
-
अंडी एक पौष्टिक पदार्थ आहे आणि अंड्यामुळे उन्हाळ्याच्या महिन्यांत ही आपल्याला अनेक आरोग्य फायदे होतात.
-
अंड्यामध्ये इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण अधिक असल्यामुळे अंडी आपल्या शरीरात उष्णता प्रेरित करत नाहीत. यामध्ये असलेले सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस शरीरात उष्णतेचे संतुलन करण्यासाठी मदत करते.
-
उन्हाळ्यामुळे आपल्याला सतत थकवा वाटू शकतो, अंडी हा प्रथिनांचा स्त्रोत असल्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात दिवसभरासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होते.
-
अंड्यामध्ये असलेले आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोह हे तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावता
Healthy Living: उन्हाळ्यामध्ये अंडी खाणं योग्य की अयोग्य? वाचा काय आहेत परिणाम…
जसे उन्हाळ्यात उष्णता वाढते तसे अनेकांना प्रश्न पडतो की त्यांच्या आहारात अंडी समाविष्ट करणे योग्य आहे की नाही कारण उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरात अधिक उष्णता निर्माण होते असा एक समज आहे. जाणून घेऊया याबद्दल तज्ञांचे मत.
Web Title: Healthy living is it right or wrong to eat eggs in summer read experts advice arg 02