-
केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. (फोटो : Freepik)
-
मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, केळीची साल सुद्धा आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. केळीच्या सालीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो.(फोटो : Freepik)
-
केळीच्या सालीचा फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. केळी त्वचेसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते.(फोटो : Freepik)
-
केळीच्या सालीमध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, फायबर असे अनेक घटक असतात. जे त्वचेतील घाण काढून टाकते. केळीच्या सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर चोळा, यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि काळपटपणा दूर होतो.(फोटो : Freepik)
-
केळीच्या सालीचा आतील भाग तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्सवर लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होते. १० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. (फोटो : Freepik)
-
जर तुम्ही डार्क सर्लकलने त्रस्त असाल तर केळीच्या सालीचा आतील भाग डोळ्यांखाली चोळा. केळीची साल वापरण्यापूर्वी चेहरा नीट धुवा.(फोटो : Freepik)
-
केळीच्या सालीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. केळीच्या सालीचा फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.(फोटो : Freepik)
-
यासाठी आपल्याला केळीची साल, दही, कोरफड, गुलाब पाणी आणि हळद लागणार आहे. हे सर्व साहित्य बारीक करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. (फोटो : Freepik)
-
साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजेत.(फोटो : Freepik)
केळीच्या सालीचा करा फेसपॅक! चेहऱ्याला लावा आणि मिळवा सुंदर आणि चमकदार त्वचा
Banana Peel For Acne: केळीच्या सालीचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा
Web Title: Benefits of rubbing banana peels on face beauty banana peels benefits for skin use like this for glowing face srk