-
उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ३५ च्या पुढे गेला आहे. त्यामुळे उष्णतेवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी आरोग्याची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. (Photo: Freepik)
-
लठ्ठपणा दूर करून शरीराला एक परिपूर्ण आकार देणे असो किंवा आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवणे, योगासने हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे. (Photo: Freepik)
-
फक्त शारीरिक, मानसिक स्वास्थ्यच नाही, तर योग करून तुम्ही उन्हाळ्यातही स्वतःला थंड ठेवू शकता.(Photo: Freepik)
-
शीतली प्राणायाम आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी केला जातो. या प्रकारात तोंडावाटे हवा आत घेऊन नाकावाटे सोडली जात असल्याने शरीराला थंडावा मिळतो.(Photo: Freepik)
-
हे एक प्रकारचे श्वास घेण्याचे तंत्र आहे; जे आपले शरीर आतून थंड करण्यासाठी विशेषत्वाने उपयुक्त ठरते. हे आसन आपल्याला शरीर थंड राखण्यास मदत करते.(Photo: Freepik)
-
काक म्हणजे कावळा. या आसनामध्ये कावळ्याच्या चोचीसारखी मुद्रा बनवतात म्हणून याला ‘काकी मुद्रा’, असे म्हणतात.(Photo: Freepik)
-
शवासन हे आसन अन्य आसने केल्यानंतर शरीर आणि मनाला आराम मिळावा यासाठी अखेरीस केले जाते. या आसनात मनुष्य हालचाल न करता, शवासारखे पडून राहतो म्हणूनच त्यास शवासन म्हणतात.(Photo: Freepik)
-
या आसनामुळे शारीरिक, मानसिक थकवा, ताण कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, निद्रानाश यांवरही हे उपुयक्त आहे. (Photo: Freepik)
-
अशा प्रकारे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ही योगासने करा आणि निरोगी व आनंदी राहा.(Photo: Freepik)
Yoga For Summer: योगासनांचे ‘हे’ प्रकार शरीराला ठेवतात थंड! उन्हाळ्यात करून बघाच
Yoga For Summer: तुम्हाला माहिती आहे का, योग करून तुम्ही उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवू शकता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. चला जाणून घेऊया अशा योगासनांविषयी, जे उन्हाळ्यात तुम्हाला कुल ठेवतील.
Web Title: Yoga for summer these yoga practices can help protect you against a heat stroke try these yoga asanas to stay cool in summer srk