-
अनेक जण सकाळी, तर काही जण संध्याकाळी व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, तुम्ही व्यायामशाळेत जाण्यापूर्वी योग्य पदार्थ किंवा पेयाचे सेवन करता का हेसुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
आज आपण या लेखातून व्यायामशाळेत जाण्यापूर्वी कोणत्या पेयाचे सेवन केले पाहिजे आणि त्याचे आरोग्यसाठी काय फायदे आहेत हे पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
संध्याकाळी व्यायामशाळेत जाण्यापूर्वी (प्री-जिम) कॉफीचे सेवन करीत असाल, तर त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. एफआयटीटीआर (FITTR) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओतील माहितीनुसार, रात्री ११ वाजेपर्यंत जर तुम्ही झोपत असाल, तर दुपारी ३ नंतर तुम्ही कॉफीचे सेवन टाळले पाहिजे. कारण- कॅफिन शरीरात आठ तास टिकून राहते. त्यामुळे एखादी व्यक्ती बदल म्हणून कॉफीऐवजी बीटाच्या रसाचे सेवन करू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
याचसंबंधित द इंडियन एक्स्प्रेसने पोषणतज्ज्ञ, होलिस्टिक वेलनेस कोच आणि ईट क्लीन विथच्या संस्थापक एशांक वाही यांच्याशी संवाद साधला. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
कॉफी एकाग्रता वाढवू शकते; पण कॉफीच्या सेवनाने लघवीचे प्रमाणदेखील वाढू शकते. त्याशिवाय कॉफीमधील कॅफिन जरी मध्यम प्रमाणात फायदेशीर असले तरीही ते हृदयाची गती आणि अस्वस्थता वाढवू शकते; ज्यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर बीटाचा रस नायट्रेट्सचे एक पॉवरहाऊस आहे. नायट्रिक घटक पोटात गेल्यावर त्याचे नायट्रिक ऑक्साइडमधे परिवर्तन होते. ही प्रक्रिया शरीराच्या स्नायूंना मजबूत बनवते, तुमच्या स्नायूंमधील रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनची पातळी वाढते. ज्यामुळे जास्त वेळ किंवा त्रासदायक वर्कआउट्ससुद्धा तुम्ही अगदी सहज करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
एक बीट स्वछ धुऊन ते सोलून घ्या. त्यानंतर त्याचे लहान तुकडे करा आणि अर्धा कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तयार झालेला रस गाळून घ्या. चव आणि पौष्टिकता वाढविण्यासाठी तुम्ही यात आल्याचा एक छोटा तुकडा किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
व्यायामापूर्वी सुमारे दोन ते तीन तास आधी बीटाच्या रसाचे सेवन करा. कारण- त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात. तसेच हे तुमच्या स्नायूंचे दुखणेदेखील कमी करते. तसेच केवळ व्यायामापूर्वीच नाही, तर दीर्घकालीन आरोग्यासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
कॉफी की बीटाचा रस? जिमला जाण्यापूर्वी कोणत्या पेयाचे करावे सेवन? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
व्यायामशाळेत जाण्यापूर्वी कॉफी की बीटाच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते चला पाहू…
Web Title: Beetroot or coffee which is better before going for gym you can choose option beetroot juice as a replacement asp