-

मिठाचे स्वयंपाकघरात स्थान जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते शरीराच्या क्रिया योग्य प्रकारे होण्यासाठीसुद्धा आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, आहारात मीठ जास्त घालणे किंवा आरोग्यासाठी मीठ घातक म्हणून मिठाचे सेवन कमी करणे या दोन्ही गोष्टींचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्यतज्ज्ञ डॉक्टर जेम्स डिनिकोलँटोनियो चेतावणी देतात की, कमी मिठाचे सेवन तुमच्या झोपेवर आणि हाडांच्या ताकदीवर नकारात्मक परिणाम करू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर या संबंधित अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरू येथील स्पर्श हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर प्रणव होन्नावरा श्रीनिवासन यांच्याशी चर्चा केली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की, शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सचे होमिओस्टॅसिस राखण्यात सोडियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मिठात सोडियम असते, जे कॅल्शियम शोषून हाडांमध्ये टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. कमी सोडियम आहारामुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि हाडे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अपुऱ्या मिठाच्या सेवनामुळे कॅल्शियमचे नकारात्मक संतुलन होऊ शकते, ज्यामुळे शरीर आवश्यक रक्त पातळी राखण्यासाठी हाडांमधून कॅल्शियम बाहेर टाकू शकते; ज्यामुळे हाडांची रचना कमकुवत होते.शरीरातील अपुरी मीठ पातळी या न्यूरोट्रांसमीटरच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे गाढ, पुरेशी झोप मिळविण्यात अडचणी येतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग टाळण्यासाठी दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाण्याची शिफारस केली आहे. पण वय, आरोग्यस्थिती आणि जीवनशैलीच्या घटकांवर आधारित वैयक्तिक गरजा बदलू शकतात, असे डॉक्टर प्रणव श्रीनिवासन स्पष्ट करतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
मूत्रपिंडाचे विकार, एडिसन रोग किंवा काही लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे (पोटॅशियम-स्पेअरिंग लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ) वापरणाऱ्या व्यक्तींना जास्त मीठ घेणे आवश्यक असू शकते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
कमी मिठाचा आहार सामान्य लोकांसाठी हानिकारक मानला जात असला तरीही उच्च रक्तदाब, हार्ट फेल्यूअर किंवा मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांना मात्र कमी मीठ आहाराचे सेवन करण्याच्या सल्ला दिला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik)
आहारात मिठाचे प्रमाण कमी करताय? रोज किती मीठ खाणं योग्य? पाहा तज्ज्ञ काय सांगतात
सोयीनुसार मिठाचे प्रमाण आहारात कमी,जास्त करत असाल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या पुढील गोष्टी नक्की लक्षात ठेवा…
Web Title: Reducing salt in your diet is good for your health but too little salt might be harmful read what expert said and follow tips asp