• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. rcb star player cameroon green 40 percent kidney failed how to avoid kidney disease perfect diet plan for clean stomach kidneys svs

६० टक्के काम करणाऱ्या किडनीने खेळतोय RCB चा स्टार! किडनी निकामी होणे टाळण्यासाठी तुमचाही ‘असा’ असावा आहार

Kidney Cure: किडनीचा ‘हा’ आजार पूणर्पणे बरा होत नसला तरी औषधे, आहार, व्यायाम व तज्ज्ञांच्या सल्ल्याने यावर नियंत्रण नक्कीच मिळवता येऊ शकते. तसेच खबरदारी म्हणून सुद्धा आपण आहारात खालील बदल करू शकता.

May 13, 2024 20:00 IST
Follow Us
  • RCB Star Player Cameroon Green 40 Percent Kidney Failed How To Avoid Kidney Disease
    1/12

    “हा’ १२ वर्षांपेक्षा जास्त जगू शकत नाही”, हा डॉक्टरांचा अंदाज खोटा सिद्ध केलेला खेळाडू कॅमरून ग्रीन हा क्रिकेटच्या मैदानातच नव्हे तर खऱ्या आयुष्यात सुद्धा स्टार आहे.

  • 2/12

    कॅमरूनला जन्मापासून क्रोनिक किडनीचा विकार होता व जन्मानंतर काही वर्षांतच हा विकार दुसऱ्या टप्यापर्यंत पोहोचला होता. यामुळे सतत क्रॅम्प येणे, आजारी पडणे हे त्रास त्याच्यासाठी नेहमीचेच झाले होते

  • 3/12

    इतकी वर्षे कठोर शिस्तीचे डाएट व व्यायामाचे रुटीन ६० टक्केच कार्यरत असणाऱ्या किडनीच्या बळावर ग्रीन आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. कॅमरूनला झालेल्या या क्रोनिक किडनी आजाराविषयी व त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीविषयी आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत

  • 4/12

    डॉ दीपक कुमार चित्राल्ली, वरिष्ठ सल्लागार, नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन, मणिपाल हॉस्पिटल सांगतात की, किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी करणारा हा आजार आहे. यामुळे शरीरातून बाहेर टाकायचे घटक फिल्टर करताना अडचणी येऊ लागतात. काहींना जन्मापासूनच हा आजार असतो तर काहींना हायपर टेन्शन व मधुमेहामुळे आजार होऊ शकतो

  • 5/12

    अशा स्थितीत प्रथिने, चरबी, सोडियम, पोटॅशियम आणि अगदी द्रवपदार्थ सुद्धा शरीरात अधिक प्रमाणात जमा होऊ देऊ नये. सुरुवातीच्या टप्प्यात, मीठ आणि पोटॅशियम-समृद्ध अन्न कमी करणे सुद्धा पुरेसे ठरू शकते. आहारातील बदल क्रिएटिनिन पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे किडनीच्या आजारांची वाढ आपल्या नियंत्रणात राहू शकते

  • 6/12

    वाणी कृष्णा, बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलचे स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, किडनीच्या आरोग्याची स्थिती पहिल्या ते तिसऱ्या टप्यात असेल तर क्रिएटिनिनची पातळी 1.4 mg/dL च्या पुढे वाढलेली नसते. अशावेळी तुमच्या प्रथिनांचे सेवन शरीराच्या वजनाच्या प्रति किलो ०.८ ग्रॅम असावे.

  • 7/12

    उंचीनुसार वजनाची सरासरी सुद्धा लक्षात असायला हवी, उदाहरणार्थ, जर तुमची उंची १६० सेमी असेल परंतु वजन ६० किलो ऐवजी ८० किलो असेल, तर प्रथिनांचे सेवन हे ६० किलोच्या ०.८ ग्रॅम टक्के असावे. दिवसभरात प्रथिने एकाच जेवणात खाऊ नये, उलट दिवसभरात वेगवेगळ्या वेळी घ्यायच्या आहारात हे प्रमाण वाटलेले असावे

  • 8/12

    शरीराच्या आदर्श वजनाच्या प्रति किलो २५ ते ३० कॅलरीज आहारात असायला हव्यात. सोडियमचा वापर दररोज ३ ग्रॅमपेक्षा कमी, फॉस्फरस १००० मिलीग्राम प्रतिदिन आणि पोटॅशियम प्रतिदिन ३००० मिलीग्रामपेक्षा कमी असावा

  • 9/12

    तुम्हाला सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे सेवन मर्यादित करायचे असल्याने, तुम्ही बटाटे, केळी, क्लस्टर बीन्स, फ्रेंच बीन्स, एवोकॅडो, ड्रमस्टिक (शेंगा), पालक, पालेभाज्या, नाचणी, ज्वारी आणि बाजरी यांचा वापर मर्यादित केला पाहिजे.

  • 10/12

    कमी मिठाचा आहार रुचकर करण्यासाठी, लसूण, कांदा, लिंबाचा रस, तमालपत्र, चिंचेचा कोळ, व्हिनेगर, दालचिनी, लवंग, जायफळ, काळी मिरी आणि जिरे यासारखे मसाले वापरा

  • 11/12

    फायबरयुक्त दुधी, झुकिनी, काकडी आणि भोपळा हे भाज्यांचे सुरक्षित पर्याय ठरतील व फळे सुद्धा नॉन सिट्रिक (लिंबू वर्गीय नसलेली) असावीत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 12/12

    हे ही वाचा<< पोहे बनवताना चुकूनही ‘हा’ पदार्थ घालायला विसरू नका; प्रमाण किती हवं व एकावेळी किती पोहे खावेत? तज्ज्ञांकडून ऐका

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Rcb star player cameroon green 40 percent kidney failed how to avoid kidney disease perfect diet plan for clean stomach kidneys svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.