-
ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो.
-
शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत शनीच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर जास्त असतो. ज्योतिषशास्त्रात शनिला कर्मदेवता म्हटलं आहे.
-
शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार त्याचे फळ देतो. शनि ग्रह सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. शनिदेवाने याच राशीच शश राजयोगही निर्माण केला आहे.
-
२०२५ पर्यंत शनिदेव याच राशीत राहणार आहेत. त्यामुळे काही राशींना शनिदेवाच्या कृपेने आयुष्यात अपार सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या…
-
शनिदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना जीवनात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. तसेच शेअर मार्केट आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात.
-
वृश्चिक राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते. यावेळी नशीब तुम्हाला साथ देऊ शकतो. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते.
-
शनिदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. तुम्हाला मोठे पद आणि मोठा पगार मिळू शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पुढील वर्षापर्यंत ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Shash Rajyog: शनिदेवाच्या कृपेने २०२५ पर्यंत काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
Web Title: Saturn planet transit made shash rajyog these zodiac sing can get huge money pdb