-
एप्रिल आणि मे महिना म्हणजे अजिबात नको होणारा कालावधी. उन्हाचा कडाका वाढल्याने शरीराची लाहीलाही, त्यामुळे प्रमाणाबाहेर येणारा घाम आणि होणारी चिकचिक नको होते. (Photo: Freepik)
-
त्यातही घशाला आणि तोंडाला सतत कोरड पडत असल्याने सारखं पाणी प्यावसं वाटतं. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता होणे, उन्हाळी लागणे, चक्कर येणे किंवा डिहायड्रेशन अशा समस्या निर्माण होतात.(Photo: Freepik)
-
लोकसभा निवडणुका सुरु आहेत. मुंबईकर उद्या मतदान करण्यासाठी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जातील. अशातच भर उन्हात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे आजच्या लेखात समजून घेऊयात.(Photo: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
महिलांनी घराबाहेर जाताना डोक्याला आणि चेहऱ्याला स्कार्फ आवर्जून बांधायला हवा. या स्कार्फमुळे कडक उन्हापासून आपल्या डोक्याचे संरक्षण होते. इतकेच नाही तर उन्हाच्या चटक्यामुळे काळी पडणारी स्कीन आणि केस यांचेही संरक्षण होते.(Photo: Freepik)
-
त्यामुळे उन्हात बाहेर पडताना कॉटनची ओढणी किंवा दुपट्टा घ्यायला अजिबात विसरु नका. इतकेच नाही तर तुम्ही गाडीवर किंवा चालत फिरणार असाल तर गॉगल लावायला विसरु नका, त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे संरक्षण व्हायला मदत होईल.(Photo: Freepik)
-
उन्हाळ्याच्या दिवसांत सूर्यकिरणे तीव्र असतात. ही किरणे अंगावर पडली की त्यामुळे सन बर्न किंवा त्वचेला रॅश येणे, खाज येणे अशा समस्या उद्भवतात.(Photo: Freepik)
-
अशावेळी आपण घरातून बाहेर पडताना हाताला, मान आणि चेहऱ्याला आवर्जून सनस्क्रीन लोशन लावतो. मात्र काही वेळाने याचा इफेक्ट कमी होत जातो. (Photo: Freepik)
-
उन्हाळ्यात नेहमी सुती आणि आरामदायी कपडे घालावेत. कारण, इतर कापडांमुळे तुम्हाला खूप लवकर उष्णता जाणवायला लागेल आणि तुम्ही दिवसभर अस्वस्थ राहाल.(Photo: Freepik)
-
गरमीच्या दिवसांमध्ये चेहऱ्याला दिवसातून एकदा तरी मुलतानी मातीचा लेप लावावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत होईल तसचं त्वचा देखील उजळेल.(Photo: Freepik)
Skincare: मुंबईकरांनो भर उन्हात मतदानासाठी जाण्याआधी ‘ही’ काळजी नक्की घ्या
Skin Care Tips : लोकसभा निवडणुका सुरु आहेत त्यामुळे मतदान करण्यासाठी तर प्रत्येक नागरीकाला मतदान केंद्रावर जाणं अनिवार्य आहे. अशातच भर उन्हात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे आजच्या लेखात समजून घेऊयात.
Web Title: Going to vote loksabha election mumbai in summer sunlight skin care while traveling srk